संजय राऊतांनंतर कुणाल कामराने घेतली सुप्रिया सुळेंची भेट

Sanjay Raut - kunal kamra-Supriya Sule.jpg

मुंबई : स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने (Kunal Kamra) काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेतली होती. यानंतर उलट -सुलट चर्चेला उधाण आले होते . आता कुणाल कामराने खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचीही भेट घेतली आहे.

दोन दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन कुणालसोबतचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर, फेसबुक आणि ट्विटरवरुन या फोटोची चांगलीच चर्चा रंगली. अनेकांनी या फोटोवरुन कंगनाला ट्रोल केले असून नेटीझन्सला या मुलाखतीची उत्सुकता लागली आहे. आता, कुणाल कामराने खासदार सुप्रिया सुळे यांचीही भेट घेतली आहे. त्यामुळे, कुणालने सुप्रिया सुळेंचीही मुलाखत घेतलीय का? असा प्रश्न अनेकांना पडलाय. खासदार सुळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या भेटीचा फोटो शेअर करत, विथ कुणाल कामरा असं लिहलं आहे. त्यामुळे, आता सुप्रिया सुळे आणि कुणाल कामरा यांची भेटही चर्चेचा विषय ठरणार आहे.

दरम्यान सध्या सोशल मीडियावर शिवसेना (Shiv Sena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) यांच्या झालेल्या भेटीची चर्चा रंगली आहे . कुणालच्या ‘शट अप या कुणाल’ या पॉडकास्टमध्ये कुणालने राऊतांना जेसीबी भेट दिल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. मात्र, यावर अभिनेत्री कंगना रणौतने नाराजी व्यक्त केली आहे. सोबतच संजय राऊत आणि कुणाल कामरा यांच्यावर निशाणादेखील साधला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER