या पाकिस्तानी शास्त्रज्ञानं ‘नोबेल पुरस्कार’ मिळाल्यानंतर ‘भारतीय गुरुच्या’ पायावर डोकं ठेवलं होतं!

Maharashtra Today

पाकिस्तानी शास्त्रज्ञ डॉ. अब्दूस सलाम (Dr. Abdus Salam)यांना १९७९ साली फिजिक्स विषायतल्या संशोधनासाठी नोबले पुरस्कार मिळाला. पार्टिकल फिजिक्समध्ये त्यांनी केलेल्या उत्तुंग कामगिरीमुळं ‘हिग्स बॉसन’चा शोध लागणं शक्य झालं होतं. आज या हा शोध ‘गॉड पार्टिकल’ (God Particles’) या नावानं ओळखला जातो.

त्यांनी केलेल्या संशोधनामुळच पाकिस्तान सारख्या धार्मिक राष्ट्राची ओळख थोडीफार का होईना पण विज्ञानवादी राष्ट्र अशी बनली. त्यांना पुरस्कार मिळून चार दशकं उलटून गेली तरी त्यांच्या शोधामुळं आज अनेक वैज्ञानिक क्लुप्त्या सुटताना दिसतात. पुस्कार मिळून चार वर्ष झाल्यानंतर सुद्धा पाकिस्तानी लोक त्यांच नाव घेत नाहीत. त्यांनी पाकिस्तानाला सन्मान मिळवून दिला पण त्यांना तरी प्रसिद्धी मिळाली नाही. डॉ. सलाम अहमदिया समुहातून येतात. पाकिस्तानानं या समुहाला गैर मुस्लीम समुदाय ठरवलंय.

सलाम यांच्या आयुष्यावर जगातल्या सर्वोत्कृष्ठ ‘ओटीटी प्लॅटफोर्मवर’ (OTT Platform)आलेल्या डॉक्यूमेंट्रीनं त्यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकला. यामुळं अनेक माहिती नसलेल्या गोष्टी समोर आल्यात. त्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा हिस्सा भारतीयांशी जोडला गेलाय. ज्याचा संपूर्ण भारतीयांना अभिमान वाटला पाहिजे.

जेव्हा डॉ. सलाम यांचा नोबेल पारितोषकानं सन्मान करण्यात आला तेव्हा भारत सरकारला त्यांनी विनंती केली होती. विनंती होती शिक्षकाचा पत्ता सांगण्याची. फाळणी आधी लाहोरच्या ‘सनातन’ महाविद्यालायत या शिक्षकानं गणित शिकवलं होतं. फाळणीनंतर ते भारतात आले तेव्हापासून डॉ. सलाम आणि त्या शिक्षकांची भेट झाली नव्हती. त्या गणित शिक्षकाचं नाव होतं अनिलेंद्र गांगूली. गांगूली यांच्यामुळेच डॉ. सलाम यांच्या मनात गणिताबद्दल ओढ निर्माण झाली. सलाम यांना गांगूलींचा पत्ता मिळाला. दोन वर्षानंतर त्यांनी १९८१ ला कोलकत्ता गाठलं गांगूलींच्या भेटीसाठी.

सलाम त्यांच्या प्रोफेसरला का शोधत होते?

गणिताबद्दलची जिज्ञासा सलाम यांच्या मनात गांगूलींमुळं निर्माण झाली असं डॉ. सलाम मानायचे. गणिताच्याच जोरावर त्यांनी जगातला सर्वोत्कृष्ठ पुरस्कार मिळवला. गुरुच्या शिकवणीचं हे फलीत होतं. त्यांना गुरुला भेटून कृतज्ञता व्यक्त करायची होती.

जेव्हा सलाम गांगूलींना भेटले तेव्हा गांगूलींची अवस्था कमजोर होती. त्यांच वय जास्त होतं. त्यांना धड उठता बसता ही यायचं नाही. सलाम यांनी नोबेल पुस्कार गांगूली यांच्या समोर ठेवला आणि हे तुमच्याच प्रेमळ शिकवणीमुळं शक्य झालं असे उद्गार काढले. ते मेडल त्यांनी गुरुच्या गळ्यात घातलं. एका शिक्षकासाठी हा खुप मोठा सन्मान होता. हे गुरु शिष्याचं प्रेम होतं जे देश, धर्म आणि सीमेच्या पलिकडचं होतं. पण गोष्ट इथंच संपली नाही.

१९८१ मध्ये ‘युनिर्वसिटी ऑफ कोलकत्ता’नं डॉ. सलाम यांना ‘द देवप्रसाद सर्बाधिकारी’ गोल्ड मेडेलनं सन्मानित करण्याचा निर्णय घेतला. पण डॉ. सलाम यांनी विनम्रता पुर्वक पुस्कार नकारला. या पुस्कराचे खरे हकदार त्यांचे शिक्षक गांगुली आहेत. त्यांचा सन्मान करावा असं ही त्यांनी सांगितलं. विद्यापीठानं अनिलेंद्र गांगूली यांच्या सन्मानासाठी छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी डॉ. सलामदेखील उपस्थीत होते. गुरुच्या सन्मानाचे ते साक्षिदार झाले. काही महिन्यांनंतर १९८२ मध्ये अनिलेंद्र बाबुचा मृत्यू झाला.

गुरु- शिष्याच्या परंपरेचं उदाहरण त्यांनी प्रस्थापित केलं. दुःखाची बाब अशी की त्यांच्या देशाकडून मात्र त्यांना कधीच सन्मान मिळालं नाही; पण भारतीयांच्या हृदयात मात्र त्यांनी जागा बनवली. भारताच्या इतिहासाचं एक या मोठ्या मनाच्या इतिहासकाराला समर्पित केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button