राज ठाकरे अयोध्येत गेल्यानंतर त्यांना तिथे..; संजय राऊत

Sanjay Raut - Raj Thackeray

मुंबई :- शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावर भाष्य केले .

राज ठाकरे यांनी अयोध्येत गेले पाहिजे. त्यासाठी आम्ही त्यांचे स्वागत करतो. राज ठाकरे अयोध्येत गेल्यानंतर, त्यांना तिथे शिवसेनेने केलेले कार्य दिसेल, असे संजय राऊत म्हणाले. पुण्यात पत्रकारांनी त्यांना राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबद्दल प्रश्न विचारला, त्यावर त्यांनी हे उत्तर दिले .

गेल्या दीड वर्षांपासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अयोध्येत गेले. त्यातून नवीन आंदोलन सुरु झाले. त्याचा परिणाम म्हणून राम मंदिर होताना दिसतय” असे संजय राऊत म्हणाले. तिथे गेल्यानंतर राज ठाकरेंना काही मदत लागली तर नक्कीच आम्ही मदत करु असे संजय राऊत यांनी सांगितले.

अयोध्येत आपले दैवत, अस्मिता आहे. देशातल्या प्रत्येक राजकीय नेत्याने, कार्यकर्त्यांने अयोध्येला गेले पाहिजे. राम मंदिरासाठी या देशातल्या हिंदुंनी जो लढा दिला, त्यात शिवसेनेचाही सहभाग होता. त्याच्या खूणा तिथे दिसतील” असे संजय राऊत म्हणाले.

ही बातमी पण वाचा : राष्ट्रवादीची ताकद शिवसेनेपेक्षा जास्त, निवडणुकीत त्यांची मदत होईल – संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER