राज ठाकरेंपाठोपाठ देवेंद्र फडणवीसांची घोषणा ; अयोध्येला जाणार!

Devendra Fadnavis & Raj Thackeray

अहमदनगर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अयोध्या (Raj Thackeray Ayodhya) दौरा करणार आहेत. येत्या 1 मार्च ते 9 मार्चदरम्यान राज ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी दिली. राज ठाकरे यांच्या या दौऱ्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Ayodhya) यांना विचारले असता, ते म्हणाले, मी सुद्धा अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.

राज ठाकरे यांचा अयोध्येला जाण्याचा निर्णय चांगला आहे. सगळ्यांनीच अयोध्येला गेले पाहिजे, मी देखील जाणार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे हे कृषी विधेयकाविरोधात उपोषण करण्याच्या तयारीत आहे. मात्र अण्णांच्या मनधरणीसाठी देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा राळेगणसिद्धीला गेले आहेत. यावेळी केंद्रीय कृषीराज्यमंत्री कैलास चौधरी हे सुद्धा उपस्थित आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER