राठोड प्रकरणात पवारांच्या नाराजीनंतर महाविकास आघाडीत निर्माण झालाय का संभ्रम?

Sharad Pawar - Sanjay Rathod

गेल्या पंधरवड्यापासून पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चांगलच तापलय. राज्याच्या राजकारणात यामुळं वादाला तोंड फुटलय. पुजा चव्हाणच्या मृत्यूप्रकरणी संशयाची सुई ज्या वनमंत्री संजय राठोडांवर (Sanjay Rathod) आहे त्यांनी बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असणाऱ्या पोहरादेवी येथे जावून मोठे शक्ती प्रदर्शन केले. आत्महत्येचा गंभीर आरोप आणि कोरोना प्रसाराची भिती या दोन्ही गोष्टींमुळं संजय राठोड यांच्यावर टिकेची झोड उठलीये. या प्रकरणावर शरद पवार (Sharad Pawar) नाराज असल्याचं बोललें जातंय.

शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे टीकटॉक स्टार पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळं वादात सापडलेत. हे आरोप झाल्यापासून १५ दिवस नॉट रिचेबल असणाऱ्या राठोड यांनी वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असणाऱ्या पोहरादेवी इथं मोठं शक्ती प्रदर्शन केलं. यावर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. पाठोपाठ राज्याचे महसूल मंत्री कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील जमलेल्या गर्दीबद्दलचा आक्षेप नोंदवला. या एकूण प्रकारत महाविकास आघाडीत शिवसेनेला एकट पाडलं जात असल्याचं चित्रय.

शरद पवारांची नाराजी

वनमंत्री संजय राठोडांवर या प्रकरणी शरद पवार नाराज आहेत. त्यांनी तात्काळ पदावरुन दुर व्हावं. जास्तवेळ पदावर राहू नये असं त्यांच म्हणनं असल्याच सुत्र सांगतायेत. पोहरादेवी येथे कार्यकर्तांनी केलेली गर्दी आणि त्यातून करण्यात आललें शक्ती प्रदर्शनामुळं महाविकास आघाडीची आणि मुख्यमंत्र्यांची प्रतिमा

नाना पटोलेंनी केली पाठराखण

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी (Pooja Chavan Suicide Case) मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असून, चौकशीअंती सत्य समोर येईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे म्हणणे आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्यांच्या कार्यक्रमास होणाऱ्या गर्दीबाबत कोणी काही बोलत नाही, असेही पटोले यांचे म्हणणे आहे. मात्र, थोरात यांनी पोहरादेवी गडावर झालेल्या गर्दीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. करोना रोखण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन ठाकरे यांनी यापूर्वीच केलेले आहे. तरीही राठोड यांच्या समर्थकांनी गर्दी केली. या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून कारवाई केली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

संजय राऊत म्हणाले

मंगळवारी वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ पोहरादेवी येथे मोठी गर्दी जमली होती. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नियम तोडल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत, असे वक्तव्यही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे.

एकीकडे राज्यात कोरोनाचं संकट असताना ही गर्दी पाहायला मिळाली. कोरोनाची परिस्थिती पाहता जमलेली गर्दी गंभीर होती. त्यामुळे संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली होती.

मुख्यमंत्री हे कायद्याची आणि नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करतात. काल जमलेल्या गर्दीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सक्त कारवाईचे आदेश दिले आहेत, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

संजय राठोड या प्रकरणावर म्हणाले

“पूजा चव्हाण हिच्या कुटुंबाच्या दु:खात मी आणि माझा बंजारा समाज सहभागी आहे. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात अतिशय घाणेरडं राजकारण केलं जात आहे, ते अतिशय चुकीचं आणि निराधार आहे. गेल्या 30 वर्षांच्या माझ्या सामाजिक आणि राजकीय जीवनाला उद्ध्वस्त करण्याचा वाईट प्रकार सुरू आहे. माझ्याबद्दल जे काही दाखवलं त्यात काहीही तथ्य नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीतून सत्य समोर येईल, असं संजय राठोड यांनी सांगितलं. माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करु नका.” अशी हात जोडून विनंती त्यांनी केली.

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER