उदयनराजे भोसले पवारांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला वर्षा बंगल्यावर

मुंबई :- भाजपचे नेते खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle) यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर भेट घेतली. त्यांच्या या भेटीमागचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.

उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वीच दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहचले.

उदयनराजे मराठा आरक्षणासाठी आक्रमक

मराठा आरक्षणासाठी आपण सर्वच स्तरावरचे प्रयत्न करणार असल्याचे उदयनराजे म्हणाले होते. एवढेच नाही तर, मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी वेळ पडल्यास मी रथीमहारथींना साष्टांग नमस्कार घालायला तयार आहे, असेही विधान उदयनरांजेंनी केले होते.

राज्यातील वडीलधाऱ्या माणसांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले पाहिजे, असे सांगताना राजेंचा रोख हा थेट शरद पवारांकडे होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER