पवारांनंतर संजय राऊतांनी घेतली सुप्रिया सुळेंची भेट

Sanjay Raut met Supriya Sule

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज दुपारी 12 वाजता राष्ट्रावादीचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचीदेखील भेट घेतली आहे. या भेटीने अनेक चर्चांना उत् आला आहे. सुप्रिया सुळे यांनी स्वतः संजय राऊत सोबतच्या भेटीची माहिती सोशल मीडियावरून दिली.

विधानसभा निवडणुकीनंतरच्या राजकीय नाट्यानंतर राऊत पवार भेटीची खास चर्चा होत असते.

महाराष्ट्राचे राजकारण सध्या सुशांत सिंग आत्महत्या प्रकरण, कंगना रणौतने शिवसेनेशी घेतलेला पंगा यामुळे ढवळून निघत आहेत. त्यातच नवीन बाब म्हणजे मातोश्रीला दुबई वरून दाऊदच्या हस्तकाकडून धमक्या आल्याचे वृत्त, तर शरद पवार यांच्याही सिल्हरओकवर विदेशातून धमकीचा फोन आल्याची धक्कादायक माहिती पूढे येत आहे.

त्यानंतर गृहमंत्र्यांनाही धमकीचा फोन आल्याची माहिती आहे. राऊतांच्या पवार भेटीनंतर सुप्रिया सुळेंना भेटणे यामुळे या भेटीचे गुढ वाळले आहे.

दरम्यान, मातोश्री व सिल्व्हरओकवर जे धमकीचे फोन या पार्श्वभूमीवर संजय राऊत शरद पवारांना भेटलेत. गृहविभाग राष्ट्रवादीकडे असल्याने राऊतांनी पवारांची बेट घेतसल्याचे समजते. तसेच, याचसंदर्भात चर्चा करण्यासाठी राऊत सुप्रिया सुळेंना भेटले असावेत असा अंदाज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER