जोकोवीच बाद झाल्याने नवा चेहरा ठरणार विजेता

Novak Djokovic

लाईन जजला चेंडू मारल्याने नोव्हाक जोकोवीचला यंदाच्या यूएस ओपन टेनिस स्पर्धेतुन (US Open tennis tournament) अपात्र ठरविण्यात आले आहे. जगातील नंबर वन आणि अग्रमानांकित खेळाडू अशाप्रकारे बाद होण्याची टेनिस इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे पुरुषांच्या टेनिसमध्ये 2014 नंतर प्रथमच एक नवा चेहरा विजेता म्हणून समोर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ही बातमी पण वाचा:- नोव्हाक जोकोवीचला अपात्रतेची शिक्षा, युएस ओपनमधून झाला बाद

2014 मध्ये मारिन सिलीचने युएस ओपन जिंकली होती. 2016 मध्ये स्टॅन वावरिंकाने युएस ओपन जिंकल्यानंतर फेडरर-नदाल-जोकोवीच या त्रिकुटाने इतर कुणालाही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकू दिलेली नाही. पण आता एक नवा चेहरा युएस ओपनचा विजेता ठरेल हे निश्चित आहे.

2010 पासूनचा विचार केला तर केवळ वावरिंका (तीन विजेतेपद)आणि मारिन सिलीच (एक विजेतेपद) वगळता या दशकातील सर्वच ग्रँड स्लॅम स्पर्धा फेडरर-नदाल-जोकोवीच- मरे या बिग फोरने जिंकल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER