नाशिकनंतर आता अंबाजोगाईत ऑक्सिजनचा अभाव, पाच रुग्णांचा मृत्यू; नातेवाइकांचा रुग्णालयावर आरोप

oxygen in Ambajogai - Maharastra Today

बीड : नाशिक येथे ऑक्सिजन न मिळाल्याने तब्बल २२  जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आता बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात ऑक्सिजनअभावी पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. असा आरोप मृत्यू झालेल्या नातेवाइकांनी केला आहे. याबाबत विचारले असता रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनच्या अभावामुळे झाला नसल्याचे रुग्णालयाचे डीन शिवाजी शुक्रे यांनी सांगितले आहे.

नातेवाइकांचा आरोप

राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. रोज हजारो रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातवरण आहे. आज ऑक्सिजनअभावी नाशिकमध्ये २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने राज्य आज सुन्न झाले आहे. त्यापाठोपाठ आता स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे पाच  रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. असे आरोप मृतांच्या नातेवाइकांनी केले आहेत.

ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू नाही – डॉ.शिवाजी सुक्रे

नाशिकची घटना ताजी असताना अंबाजोगाई येथेसुद्धा काही रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनअभावी झाल्याचे आरोप केले. ऑक्सिजन कमतरता होती तर रुग्णालय प्रशासनाने आधीच खबरदारी का घेतली नाही, असे आरोप होऊ लागले. त्यानंतर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी शुक्रे यांनी याबाबत स्पष्टोती दिली आहे. त्यांनी रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनअभावी झाल्याचा दावा फेटाळला. तसेच आमच्याकडे रुग्णांसाठी लागणारा आवश्यक असा ऑक्सिजनचा पुरवठा आहे, असा दावा त्यांनी केला आहे. “दिवसभरात उपचार करताना एकूण ११ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तसेच, आज मृत्यू झालेल्या सर्व रुग्णांचे वय हे ६० वर्षे आहे. यामध्ये बहुतांश रुग्ण हे शारीरिक व्याधी किंवा रक्तदाब, हायपरटेन्शन असलेले आहेत.” असे शिवाजी शुक्रे यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button