नाना पटोलेंनंतर काँग्रेसच्या आमदार म्हणालात, शरद पवारांबद्दल आदर पण…

Nana Patole-Sharad Pawar1

सोलापूर :- संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA) चे नेतृत्व शरद पवार यांनी करावे, यासाठी शिवसेनेचे संजय राऊत रोज वकिली करत आहेत. याबाबत काँग्रेसच्या नेत्यांनी उघड नाराजी व्यक्त केल्यानंतरही राऊतांची रेकॉर्ड वाजतेच आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राऊतांच्या लक्षात आणून दिले की, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली १० वर्षे मनमोहन सिंग यांचे केंद्रात सरकार होते. त्यात शरद पवार (Sharad Pawar) मंत्री होते हे विसरू नका. काँग्रेस नेत्यांवरची टीका सहन करणार नाही. आता आमदार प्रणिती शिंदे म्हणालात, शरद पवार यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. पण, सोनिया गांधी याच आमच्या नेत्या आहेत.

सोलापूर (Solapur) येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाल्यात, यूपीएच्या अध्यक्षपदाबाबत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेले वक्तव्य त्यांचे वैयक्तिक मत आहे. शरद पवार यांच्याविषयी आम्हाला आदर आहे. महाविकास आघाडी एकत्र येण्यामध्ये देखील पवार साहेबांचे योगदान मोठे आहे. मात्र, सोनिया गांधी (Sonia Gandhi) या यूपीएच्या अध्यक्ष आहेत आणि त्याच आमच्या नेत्या आहेत.

दरम्यान, लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेऊन त्यांच्या लक्षात ही बाब आणून देणार आहोत. काँग्रेसमुळे सरकार आहे, आम्ही म्हणजे सरकार नाही, हे लक्षात आणून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे यूपीएमध्ये नसणाऱ्यांनी ही फुकटची वकिली करू नये, असा टोलाही नाना पटोले यांनी संजय राऊत यांना मारला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER