जळगाव महापालिकेनंतर आता एकनाथ खडसे देणार भाजपाला जिल्हा परिषदेत धक्का

Maharashtra Today

मुंबई : भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना जळगाव महापालिकेत जोरदार धक्का मिळाला आहे. अशातच आता भाजपच्या हातातून महापालिके पाठोपाठ जिल्हा परिषदेतही जाण्याचे संकेत मिळत आहे.

जिल्हा परिषदेतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांनी आज राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे(Eknath Lhadse) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे स्थानिक राजकारणात चांगलेच सक्रिय झाले आहेत.

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे समीकरण जुळून आले. हेच समीकरण आता राज्यातील बहुतांश महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये जुळवून भाजपाला दे धक्का दिला जात आहे. गेल्या १८ मार्च रोजी जळगाव शहर महापालिकेत भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष असूनही त्यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले होते. यामुळे गिरीश महाजनांना मोठ्या नाचक्कीला सामोरे जावे लागले होते.

महापालिकेनतर एकनाथ खडसेंनी मोर्चा जिल्हा परिषदेकडे वळविला आहे. महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेतही सतातर होऊ शकते. त्या अनुपगाने आज काँग्रेसचे गटनेते प्रभाकर सोनवणे, राष्ट्रवादीचे गनते शशीकात साळुखे, शिवसेनचे गटनेते रावसाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपगटनैते रविंद्र पाटील यानी एकनाथराव खडसे याची मकाई या त्याच्या निवासस्थानी भेट घेतली,

यावेळी माजी आ.गुरुमुख जगवाणी, अशोक लाडवंजारी, अशोक पाटील, सुनील माळी, डॉ. अभिषेक ठाकुर, गोटु चौधरी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा परिषदेतील सतांतराविषयी चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल लक्षात घेता बहुमतासाठी ३३ ही सदस्य लागणार आहेत. भाजपाचे ३२ सदस्य आहेत. तर या ३२ मध्येही एकनाथराव खडसे यांचे ११ समर्थक आहेत हे समर्थक फुटल्यास जिल्हा परिषदेतही भाजपाची सत्ता जाऊ शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button