मुंबईपाठोपाठ आता पुण्यातही मनसेकडून बांगलादेशींचा शोध; पोलिसांचीही मदत

MNS Bangladeshi

पुणे : भारतात बेकायदेशीर राहात असलेल्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून द्यावे, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे. घुसखोरांना देशाबाहेर काढा, या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत मोर्चा काढला होता. या मोर्च्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईत ठिकठिकाणी बांगलादेशी आणि पाकिस्तानी नागरिकांची शोध मोहीम सुरू केली होती. यात अनेक बांगलादेशी अवैध राहात असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर मुंबईपाठोपाठ आता पुण्यातील धनकवडी परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी शोधमोहीम हाती घेतली आहे.

महाराजांचा जयजयकार करण्यात कमीपणा कसला?, मनसेचा नवाब मलिकांना सवाल

शहरातील धनकवडी भागातील बांगलादेशी लोकांना शोधण्यासाठी मनसे कार्यकर्ते पुढे आलेत. त्यांच्या मदतीला पोलीसही उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी काहींना कागदपत्रांची विचारणा केली. त्यातील काही व्यक्तींनी मात्र ते बांगलादेशी नसून बिहारी असल्याचे सांगितले. त्यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण तयार झाल्याचं दिसून आलं. सुमारे ५० मनसे कार्यकर्ते परिसरात फिरून घरांमध्ये कागदपत्रांची मागणी करत होते. जर एखाद्याकडे कागदपत्रे नसतील तर त्यांना त्यांच्या देशात पुन्हा पाठवण्याची मागणी मनसेने केली.