मध्यप्रदेश, राजस्थाननंतर आता पंजाब काँग्रेसमध्येही धुसफूस सुरू

Congress

चंदीगड : पंजाब, गुरदासपूर, बटाला येथे विषारी दारू पिऊन १०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेनंतर कॉंग्रेसच्या दोन खासदारांनी त्यांच्याच सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे. राज्यसभेचे खासदार प्रतापसिंह बाजवा आणि शमशेरसिंग ढिल्लो यांनी पंजाबच्या कॅप्टन अमरिंदरसिंग सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे. त्यामुळे पंजाब प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षांनी पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मनमोहनसिंग यांना दोन्ही खासदारांविरुद्ध कारवाईसाठी पत्रे लिहिली आहेत.

राज्यसभेचे दोन खासदार प्रतापसिंह बाजवा आणि शमशेरसिंग ढिल्लो यांच्या अनुशासनाविरुद्ध कारवाई करण्यासाठी पंजाब प्रदेश कॉंग्रेसचे  (Congress) प्रमुख सुनील जाखड (Sunil Jakhar) यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. ते म्हणाले आहेत की, मी कॉंग्रेस  अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे की, अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये आणि राज्यसभेचे खासदार प्रतापसिंह बाजवा आणि शमशेरसिंग ढिल्लो यांच्यावर योग्य ती कारवाई केली जावी. अशी वागणूक सहन केली जाऊ नये. शमशेर ढिल्लो म्हणाले होते की, ही मोठी शोकांतिका आहे. पंजाबमध्ये असे कधी झाले नव्हते. सरकार आणि पोलिसांच्या माहितीशिवाय असे होऊ शकत नाही.

म्हणूनच कोणतीही कारवाई केली जात नाही. कर्फ्यू दरम्यान अल्कोहोलसाठी कच्चा माल कसा आला? ते म्हणाले, ‘मी एक महिन्यापूर्वी राज्य सरकारला इशारा दिला होता, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मनमोहनसिंग यांना पत्रदेखील लिहिले होते, पण त्यावर कारवाई झाली नाही. त्याच वेळी कॉंग्रेसचे दुसरे खासदार प्रतापसिंह बाजवा म्हणाले की, पंजाबमध्ये दारूच्या अनियमित विक्रीमुळे आतापर्यंत ११२ लोकांचा मृत्यू झाला आहे.

सरकार आणि दारू माफियांच्या संगनमताशिवाय हे शक्य नाही. त्यांनी पंजाब सरकारवर त्यांच्या फोन कॉलकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणाले, ‘अवैध दारूमुळे होणारे मृत्यू ही अत्यंत वाईट आणि दुर्दैवी घटना आहे. पोलीस व उत्पादन शुल्क विभागाने सर्व संबंधित व जबाबदार लोकांवर कारवाई केली आहे. या प्रकरणातून कोणाचीही सुटका केली जाणार नाही आणि दोषींना कडक शिक्षा होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER