खडसेंच्या राष्ट्रवादीत प्रवेशानंतर पवार खान्देशात पक्ष विस्तार मोहिमेवर

Sharad Pawar & Eknath Khadse

जळगाव : एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) पहिल्यांदाच उत्तर महाराष्ट्रात पक्षविस्ताराच्या मोहिमेवर जात आहेत. २० आणि २१ नोव्हेंबर रोजी पवार उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार येथील शेतकरी मेळावा आणि विविध कार्यक्रमांना हजर राहणार आहेत.

एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी जवळपास महिन्याभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खडसे यांच्या प्रवेशानंतर भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीची ताकद वाढल्याची चर्चा आहे.

खडसेंचे समर्थक केवळ जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर धुळे आणि नंदुरबारमध्येही मोठ्या संख्येत आहेत. भाजपामधील अनेक खडसे समर्थक शरद पवार यांच्या या दौऱ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. शरद पवार यांच्या दौऱ्यात कोण कोण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER