कंगनानंतर ठाकरे सरकारची वक्रदृष्टी अक्षय कुमारवर , ‘अशा’प्रकारे बसू शकतो मोठा फटका

Kangana Ranaut - CM Uddhav Thackeray - Akshay Kumar

मुंबई : बॉलिवूडचा (Bollywood) खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) त्याच्या भाजपसोबत (BJP) असलेल्या जवळीकमुळे ओळखला जातो . मात्र आता हीच जवळीक त्याच्यासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. कारण भाजप आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदावर विराजमान असलेल्या शिवसेनेचे (Shiv Sena) संबंध अलिकडच्या काळात चांगलेच ताणले गेले आहेत आणि अक्षयच्या व्यावसायिकरित्या त्याला मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे .

उत्तर प्रदेशमध्ये बॉलिवूडला पर्याय निर्माण करण्याच्या हालचाली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्याकडून झाल्या, त्यांनी यासंदर्भात मुंबईत एक दौराही केला होता. या दरम्यान काही कलाकार, दिग्दर्शक तसेच निर्मात्यांच्या भेटी त्यांनी घेतल्या होत्या.

बॉलिवूड उत्तर प्रदेशला हलवण्याचा आदित्यनाथांचा डाव असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच हा डाव हाणून पाडून असं शिवसेनेनं म्हटलं होतं. या सर्व पार्श्वभूमीवर अक्षय कुमारचे योगी आदित्यनाथांची भेट घेतली होती. यामुळे ठाकरे सरकारची वक्रदृष्टी अक्षय कुमारवर असल्याचं बोललं जात आहे.

नुकताच शिवसेनेनं नवी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा दिला होता. शिवसेना खासदारा आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आंदोलनस्थळी जाऊन भाजपविरोधात शंख फुंकला होता. या प्रकरणातही काही सेलिब्रेटींनी मोदी सरकारची बाजू घेणारे ट्विट केले होते. यामध्ये अक्षय कुमारचा समावेश होता.

त्यामुळे आगामी काळात व्यावसायिक पार्श्वभूमीवर त्याची अडवणूक केली जाऊ शकते, अशी अटकळ बांधली जात आहे. कंगणाला जसे शिवसेनेने सरेआम शिंगावर घेतले होते , तशा पद्धतीने नव्हे मात्र अक्षयला आडमार्गाने त्रास सहन करावा लागू शकते असे मानलंले जात आहे.

सिनेमागृहं पूर्ण क्षमतेने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे, मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) अद्यापही यावर विचार करत असल्याची माहिती आहे. अक्षय कुमारचा सूर्यवंशी सिनेमा एप्रिलमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. सिनेमागृहे पूर्ण क्षमतेनं उघडल्यावरच हा सिनेमा प्रदर्शित व्हावा, असं निर्मात्यांचं मत आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयावर आता या सिनेमाचे भवितव्य आहे.

रिलायन्स एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली हा सिनेमा तयार करण्यात आला आहे. अक्षय कुमार, रणवीर सिंह तसेच अजय देवगण, कतरिना कैफ, गुलशन ग्रोहर, जॅकी श्रॉफ अशी स्टारकास्ट यात पहायला मिळणार आहे. भन्नाट सिनेमांसाठी ओळखला जाणारा दिग्दर्शक रोहित शेट्टींनं या सिनेमाचे दिगदर्शन केलेले आहे. त्यामुळे या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER