एका मुलाची कैफियत ऐकल्यानंतर अजित पवार झाले भावुक ; मदतीसाठी गेले धावून

Ajit Pawar Maharastra Today

बारामती : राज्यात कोरोनाचे (Corona)संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . या संकटमय काळात सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे . महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar)अशाच एका गरजू मुलाच्या मदतीसाठी धावून गेले आहेत .

पवार हे बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानला भेट देत असतात. त्यात ते नागरिकांसोबत गप्पा मारत स्थानिकांचे प्रश्न समजुन घेतात. असाच एक प्रकार शनिवारी घडला. विद्या प्रतिष्ठानला अजित पवारांनी भेट दिली. त्यावेळी अनेक लोक त्याठिकाणी अजित पवारांना भेटण्यास इच्छूक होते. त्यावेळी एका मुलाने आपली समस्या अजित पवारांना सांगितली. त्यानंतर अजित पवार भावूक झालेले दिसले.

माझ्यावर 15 लाखांचे कर्ज झाले आहे. वडिलांच्या डोळ्यावर उपचार करायचे, पण आता पैसे नाहीत, माझ्यापुढे आत्महत्येशिवाय पर्यायच नाही. आम्ही दोघे भाऊ शिकत काम करुन उदरनिर्वाह करतोय, गेले 23 दिवस झाले वडिलांसाठी आम्ही संघर्ष करतोय, पण यश येत नाही. पैशांअभावी वडिलांचा एक डोळा अगोदरच गेलेला आहे, आता दुसरा डोळा वाचविणं गरजेचं आहे, दोन दिवसांपूर्वी वडिलांना डिस्चार्ज देणार होते. पण बिल भरता येत नसल्यानं त्यांना हॉस्पिटल सोडत नाही, अशी कैफियत एका मुलाने अजित पवार यांच्यासमोर मांडली.

मुलाची ही कैफियत ऐकल्यानंतर स्वत: अजित पवारही काहीसे भावुक झाले. त्यांनी तातडीने त्यांचे स्वीय सहाय्यक सुनीलकुमार मुसळे यांना ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांना फोन लावायला सांगितला. उपमुख्यमंत्र्यांनी डॉ. लहाने यांना या युवकाला हवी असलेली औषधे उपलब्ध करुन देण्याच्या सूचना केल्यानंतर डॉ. लहाने यांनीही ही औषधे काही वेळातच उपलब्ध केली.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button