मराठा आरक्षणावरील सुनावणी पूर्ण, सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला

Maratha Reservation - Supreme Court - Maharashtra Today

नवी दिल्ली : मराठा आरक्षणावरील (Maratha Reservation) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) घटनापीठासमोरील सुनावणी आज पूर्ण झाली. सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण कायद्याविषयीचा निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राचं लक्ष सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडं लागलं आहे. मराठा आरक्षणाबाबत आज निर्णय देण्यात आला नसून, होळीनंतर निर्णय घोषित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वोच्च न्यायलयाकडून महाराष्ट्र राज्यात मराठा समाजाला नोकरी त्याचप्रमाणे शिक्षणात दिल्या जाणार्‍या आरक्षणाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणार्‍या याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होती. त्याबाबत आता देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने निर्णय ठेवला राखून ठेवला आहे.

मराठा आरक्षणाच्या वैधतेबाबत सुप्रीम कोर्टात घटनापीठासमोर नियमित सुनावणी सुरु होती. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती नागेश्वर राव, न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती एस.अब्दुल नजीर आणि न्यायमूर्ती रवींद्र भट यांच्यसमोर सुनावणी झाली. आज कोर्टामध्ये सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि ए जी वेणुगोपाल यांनी आपला युक्तीवाद पूर्ण केला. मात्र सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या बाजूने आम्ही सुप्रीम कोर्टासमोर योग्य मुद्दे मांडले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून कायम ठेवले जाईल अशी अपेक्षा आहे. सुनावणी संपली असली तरी निकाल कधी येईल हे सांगणे कठीण आहे. मात्र आता मराठा आरक्षणाचा सोक्षमोक्ष होईल, अशी भावना याचिकाकर्ते विनोद पाटील (Vinod Patil) यांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER