महाविकास आघाडीमुळे राजकीय समीकरणं बदललं, भाजप ऑपरेशन लोटस बारगळणार?

Mahavikas aghdi-BJP

मुंबई :- विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीने जोरदार इनकमिंग केल्याने भाजपची चिंता वाढली आहे. मतदारांनी पदवीधरच्या 6 पैकी 4 जागा आघाडीच्या वाट्याला आल्याने भाजपला जबर धक्का बसला आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी भाजप ऑपरेशन कमळ बारगळणार असल्याची चिन्हे सध्या दिसत आहेत. तर, आपलीच सत्ता येईल… हे सरकार त्यांच्या अंतर्गत कलहामुळे कोसळेल, असे अनेक दावे करणाऱ्या भाजपासमोर आता इतर पक्षातून आलेल्या नेत्यांनाच थोपवून धरण्याचं आव्हान उभं राहिल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

महाविकास आघाडीच्या एकीमुळे भाजपला नागपूरमध्ये प्रचंड मोठा धक्का बसला आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघ गेल्या ५५ वर्षांपासून भाजपच्या ताब्यात होता. नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि देवेंद्र फडणवीस यांचा गड म्हणून नागपूरला ओळखले जाते. पण या गडाला सुरुंग लावण्यात काँग्रेसला यश मिळाले आहे.

मुंबई महापालिका ते जिल्हा परिषद निवडणुका… भाजपचे काय होणार
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या लिटमस टेस्टमध्ये महाविकास आघाडी (Mahavikasa Aghadi) यशस्वी झाल्याने आघाडीची ताकद वाढली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेसह राज्यातील १० महापालिका आणि २२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही ही आघाडी एकत्रित दिसणार आहे. त्यामुळे या निवडणुकांना सामोरे जाताना भाजपला प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. शिवाय तोपर्यंत इतर पक्षातून भाजपमध्ये आलेल्यांना थोपवून धरण्याची तारेवरची कसरतही भाजपला करावी लागणार आहे.

दरम्यान, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील यशानंतर राज्यात ऑपरेशन लोटस होणार असल्याचं बोललं जात होतं. भाजपचे नेते नारायण राणे यांनीही राज्यात शंभर टक्के ऑपरेशन लोट्स होणार असल्याचं म्हटलं होतं. तर पदवीधरांच्या रणधुमाळीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर होणार असल्याचा दावा केला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही तसे संकेत दिले होते. त्यामुळे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील यशानंतर भाजपकडून राज्यात ऑपरेशन लोटस होणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आता भाजपला मोठा पराभव स्वीकारावा लागल्याने भाजपची मोठी कोंडी झाली आहे. त्यामुळे राज्यात ऑपरेशन लोटस होणार की भाजप वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहिल? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ही बातमी पण वाचा : जनतेने भाजपला नाकारले, राज्याचं राजकीय चित्र बदलतंय – शरद पवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER