गोकुळची सत्ता आल्यानंतर मायबहिणींना सोन्याने मडवू : हसन मुश्रीफ

Hasan Mushrif

गोकुळ (Gokul) दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापुरातील राजकारण शिगेला पोहचले आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. दोन्ही बाजूंकडून सभासदांवर आश्वासनांचा पाऊस पडत आहे. ‘गोकुळ’ची निवडणूक २ मे रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत मुश्रीफ बोलत होते.

‘गोकुळ दूध संघाची सत्ता राजकारणासाठी नाही तर शेतकऱ्यांसाठी हवी. गोकुळमधला पैसा चुकीच्या मार्गाला जात आहे, तो जाऊ नये अशी इच्छा आहे. बदल घडवण्याचा निर्णय ठरावधारकांनी घेतला आहे. गोकुळची सत्ता आल्यानंतर मायबहिणींना सोन्याने मडवून टाकू.’ असा दावा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केला.

‘गोकुळ’ची निवडणूक २ मे रोजी आहे. आम्ही अनेक चांगल्या संस्था चालवत आहोत. त्यामुळे गोकुळमध्ये आम्ही राजकीय अड्डा तयार करू, असा सत्ताधारी आघाडीचा चुकीचा आरोप आहे. अनेक वर्षे ते गोकुळमध्ये ठाण मांडून आहेत. आता त्यांना घालवून पुढे जाण्याची वेळ आली आहे, असा निर्णय सभासदांनी घेतला आहे. त्यांनी ४०० वाढीव सभासद केले असले तरी राष्ट्रवादीचे एक हजार सभासद आमच्याबरोबर असून विजय निश्चित आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी सत्ताधारी आघाडीला पाठिंबा दिला आहे आणि तो अनाकलनीय असल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button