डिप्रेशनशी लढूनच रूपाली झाली बिनधास्त

Actress Rupali Bhosle

आई कुठे काय करते (Aai kuthe kay karte ) या मालिकेत सध्या एक जबरदस्त वळण आलं आहे. दहा वर्षे असलेलं अनिरूद्ध आणि संजना यांच्या अफेयरचं सत्य अनिरूद्धची बायको अरूंधतीसमोर आल्याने तिला धक्का बसला आहे. मालिकेतील संजनाच्या हट्टामुळेच हे प्रकरण अरूंधतीला समजलं आणि संजनाकडे दोष देणारी बोटं वळली आहेत. अभिनेत्री रूपाली भोसले (Actress Rupali Bhosle) हिने मालिकेतील बिनधास्त संजना इतकी चपखल वठवली आहे की तिचा राग राग करणाऱ्या प्रतिक्रियांनी तिचा इनबॉक्स भरला आहे. मालिकेची नायिका अरूंधतीच्या आयुष्यात इतके चटके देणाऱ्या रूपालीने तिच्या खऱ्या आयुष्यात इतके धोके, चढउतार पचवले आहेत की त्यातून आलेल्या डिप्रेशनवर मात करण्याची लढाई लढून रूपालीचा स्वभाव रिअललाइफमध्येही बिनधास्त झाला आहे. लग्नानंतर पतीकडून मिळालेली चुकीची वागणूक, सासरकडून आलेली अवहेलना, आईवडीलांची जबाबदारी, भावाच्या अपघातानंतर त्याला धीर देण्याची जबाबदारी या सगळ्या व्यापात हातात पाच वर्षे काहीही काम नसल्याने आलेले नैराश्य यावर मात करून रूपालीने पुन्हा एकदा टीव्ही इंडस्ट्रीत ओळख मिळवली आहे. गेल्या काही दिवसात कोरोनामुळे काम नाही असे म्हणणाऱ्या अनेक कलाकार मित्रमंडळींशी तिने आपल्या आयुष्याचा प्रवास सांगत हे ही दिवस जातील…फक्त खंबीर रहा असे सांगत धीरही दिला आहे.

Exclusive: "I am replying back to the trolls with quality work", says Bigg Boss Marathi 2 fame Rupali Bhosle - Times of Indiaआई कुठे काय करते या मालिकेतील संजना म्हणून रूपाली पोहोचली आहेच पण गेल्या वर्षी बिग बॉस मराठी या शोमध्ये रूपाली भोसले दिसली होतीच. बिगबॉसच्या घरात रूपाली ऑफस्क्रीन कशी आहे आणि तिने आयुष्यात असे काही अनुभव घेतले आहेत की त्यातून सावरत पुन्हा खंबीरपणे उभे राहणे किती कठीण होते हे तिच्या चाहत्यांना कळाले. रूपालीची मैत्रीण आणि अभिनेत्री सुलेखा तळवलकर हिच्या एका शोमध्ये रूपालीने तिच्या आयुष्यातील हा हळवा कोपरा उघडला आणि कलाकार म्हणून जेव्हा हातात काम नसते, काम मिळावे म्हणून जेव्हा संपर्क साधला जातो तेव्हा कसे अनुभव येतात, आर्थिक गणितं कशी जुळवावी लागतात याविषयी रूपाली बोलली तेव्हा रूपाली आज ज्याप्रमाणे बिनधास्तपणे वागते त्याचा अर्थ लागतो.

अभिनयाची कारकीर्द यशाच्या शिखरावर असताना रूपालीने लग्न केले आणि ती पतीसोबत लंडनला गेली. रूपालीचा भाऊ तिच्यापेक्षा लहान असल्याने आईवडीलांची जबाबदारी आणि घर चालवण्याची जबाबदारी रूपालीवर होती. याची कल्पना तिने सासरच्या लोकांना दिली होती. पतीकडूनही सहकार्य मिळेल अशी तिची अपेक्षा होती. पण लंडनला गेल्यानंतर तिला पतीचे याबाबतीत सहकार्य मिळाले नाही. उलट तिचा तिथे मानसिक छळ सुरू झाला. पतीला अनेक विनवण्या करून शेवटी रूपाली भारतात परतली. दरम्यान, तिच्या भावाचा खूप मोठा अपघात झाला तेव्हा तिच्या पतीने साधी विचारपूसही केली नाही. सासरच्या लोकांनीही तिला एकटे पाडले. त्यावेळी रूपालीने पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आता Bigg Boss' Marathi fame Rupali Bhosle's BTS fun from 'Aai Kuthe Kay Karte' sets; watch - Republic Worldपुन्हा रूपालीला तिचे आईवडील, भाऊ यांना आधार द्यायचा होता. मधल्या काळात पाच वर्षे गेली होती त्यामुळे रूपालीच्या हातात काहीच काम नव्हतं. दरम्यान रूपालीने लंडनला जाण्याआधी बडे दूर से आये हो ही हिंदी मालिका केली होती त्यातून मिळालेल्या पैशांची बचत रूपालीसाठी या काळात आर्थिक घडी बसवण्यासाठी मदतीला आली. तिने नाहक खर्च कमी केले. एकीकडे घरची जबाबदारी आणि दुसरीकडे काम शोधण्यासाठी धडपड असा तिचा प्रवास सुरू होता. फोनाफोनी करून तिने काही मालिकांमध्ये छोटे मोठे रोल मिळवले. घराचे भाडे वाचवण्यासाठी मुंबईच्या उपनगरात घर घेऊन दोन अडीच तासांचा प्रवास करून रोज सेटवर येणं हा तिचा नित्यक्रम बनला. रूपाली सांगते की खूप खडतर काळ होता तो. अर्थातच आयुष्य संपवण्याचाही विचार मनात आला, पण तिच्यावर अवलंबून असलेल्या आईवडीलांचे तिच्या माघारी कसे होईल या विचाराने तिने स्वत:ला खंबीर बनवले. येईल त्या परिस्थितीला तोंड द्यायचे असेल तर प्रामाणिकपणे काम करणे, जिथे नाही म्हणायला हवे तिथे ठामपणे नकार देणे, कोणत्याही आमिषाला बळी न पडता कामासाठी काहीही करण्याच्या तडजोडीपासून लांब राहणे यासारख्या गोष्टी अंगी उतरवून रूपाली खऱ्या अर्थाने बिनधास्त झाली. रूपालीने शेअर केलेला हा अनुभव नक्कीच आजच्या कितीतरी कलाकारांसाठी एक धडा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER