‘कार का सरकार यावर चर्चा करण्यापेक्षा कॉमन मिनिमम कार्यक्रमावर काम केले पाहिजे – अजित पवार

CM Uddhav Thackeray - Ajit Pawar

मुंबई :  नुकतेच सह्याद्रीवर रस्ता सुरक्षा कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधत मी कार- सरकार दोन्हीही चालवतो. रस्त्यात कितीही खड्डे – स्पीडब्रेकर आले तरी मी कार सरकारवरची पकड ढिली होऊ देत नाही असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. यावर माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावत मुख्यमंत्री चांगली कार चालवतात, हे मी पाहिलं आहे, पण जेव्हा ते कार चालवतात तेव्हा ट्रॅफिक थांबलेला असतो, असं फडणवीस म्हणाले होते.

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘कार का सरकार यावर चर्चा करण्यापेक्षा कॉमन मिनिमम कार्यक्रमावर काम केले पाहिजे. या विषयावर चर्चा नको, असं मला वाटतं,’ असं म्हणत अजित पवार म्हणाले.

एकंदरीत मुख्यमंत्र्यांच्या कार – सरकारच्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात खमंग चर्चा झालेली दिसते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER