इथेनॉलनंतर आता साखरेपासून गॅसनिर्मिती : शरद पवार

Ethanol - Sugarcane - Sharad Pawar

कोल्हापूर :- केंद्र शासनाने ऊस खरेदीची किंमत निश्चित केली असली तरी साखरेच्या  विक्रीदरात त्या प्रमाणात वाढ केलेली नाही. इथेनॉलची  दरवाढ झाली तशीच साखरेची खरेदी किंमतही वाढ करावी, यामागणीसाठी देशभरातील साखर कारखानदारांचे प्रतिनिधी केंद्र सरकारला भेटणार आहेत. इथेनॉलनंतर (Ethanol) आता साखरेपासून (Sugar) गॅसनिर्मितीबाबत (Gas Production) विचार सुरू असल्याची माहिती खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

खा. पवार म्हणाले, साखर विक्रीदरात वाढ झाल्याशिवाय एफआरपी देणे शक्य नाही. केंद्र शासनाने इथेनॉलची दरवाढ केली. एफआरपी ठरविली. त्याच पद्धतीने खाखर खरेदी दरातही वाढ करण्याची गरज आहे. मात्र याबाबत निर्णयास विलंब होत आहे. राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेकर यांच्या नेतृत्वाखाली ऊस उत्पादक राज्यातील प्रतिनिधींचे शिष्टमंडळ लवकरच केंद्र शासनाला भेटणार आहे.

राज्य साखर संघाच्या बैठकीत साखर आणि उसापासून गॅसनिर्मितीबाबत चर्चा झाली आहे. साखर, इथेनॉल आदी उपपदार्थांसह गॅस निर्मिती हा कारखानदारीस चांगला पर्याय होईल. या सर्व उत्पादनातून शेतकऱ्याला उसाचा चांगला भाव देणे शक्य होईल. गॅसनिर्मितीबाबत अभ्यास करून केंद्राला अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे पवार यांनी स्षप्ट केले.

ही बातमी पण वाचा : शेतकरी आंदोलनास पाठिंबा : शरद पवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER