निवडणुकीनंतर पवारांचा पक्षच संपूर्ण रिकामा होईल – मुख्यमंत्री

धुळे :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे ग्रामीण मतदारसंघातून आपल्या उमेदवारी प्रचाराचा नारळ फोडला आहे. धुळ्यातील सभेत बोलताना फडणवीस यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. तसेच, काँग्रेस नेते सुशिलकुमार शिंदेंच्या वक्तव्यावरुनही काँग्रेस-राष्ट्रवादीवर मिश्किल टीका केली.

ही बातमी पण वाचा : पुढच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या शेजारी शिवसेनेचा मुख्यमंत्री बसलेला दिसेल – राऊत

भाजपा-सेनेशी लढा देण्यासाठी काय अवस्था झाली या दोन्ही पक्षांची. निवडणूक हरल्याचं यांनी आतापासूनच मान्यच केलंय. महाआघाडीने दोन दिवसांपूर्वी जाहीरनामा घोषित केला. त्यांचा जाहीरनामा म्हणजे जगातले सगळेच आश्वासन दिलेत. या जाहीरनाम्यात केवळ एकच आश्वासन द्यायचं राहिलंय. ते म्हणजे, ‘महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला एक-एक ताजमहाल बांधून देऊ,’ एवढंच आश्वासन द्यायचं राहिलंय, असे म्हणत फडणवीस यांनी महाआघाडीच्या जाहीरनाम्यावर टीका केली.

तसेच, राहुल गांधींनाही महाराष्ट्रातील पराभव मान्य असल्याचे फडणवीस यांनी म्हटलंय. ”काँग्रेसचे नेते राहुल गांधी बँकॉकला फिरायला गेलेत, महाराष्ट्रातील पराभव त्यांनाही माहितीय. पवारांचा पक्ष अर्धा रिकामा झालाय, उरलेला पक्ष निवडणुकीनंतर रिकामा होईल. अशी मिश्किल टीकाही त्यांनी केली.