कोरोना : रुग्णांच्या संख्येत घसरणीनंतर पुन्हा वाढ

Maharashtra Coronavirus

मुंबई : काही दिवसात कोरोनाच्या (Corona) रुग्णांच्या संख्येत घट झाल्यानंतर रविवारी पुन्हा वाढ झाली. ५०९२ नवे रुग्ण आढळले व ११० रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात रुग्णांची एकूण संख्या १७,१९,८५८ झाली असून रुग्णांच्या मृत्यूचा आकडा ४५,२४० झाला आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आहठवड्यात रोज ५०० ते ९०० नवे रुग्ण आढळत होते. रविवारी हा आकडा १००३ वर गेला. मुंबईत (Mumbai) रुग्णांची संख्या २,६४,५४५ झाली आहे. १ ते ७ नोव्हेंबर दरम्यान कोरोनाच्या वाढीचा दर ०. ३ टक्के होता.

कोरोनाच्या रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत मुंबईत घट झाली आहे. रविवारी २३ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांच्या मृत्यूचा एकूण आकडा १०,४४५ झाला आहे. नोव्हेंबर महिन्यात रोज सरासरी २४ रुग्णांचा मृत्यू झाला. ऑक्टोबर महिन्यात हा आकडा ४२ होता.

कोरोनाच्या चाचणीची संख्या वाढवल्याने रुग्णांची संख्या वादळी असावी अशी शक्यता मुंबई मनपाचे अतिरिक्त सुरेश काकाणी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, रोज ११ ते १५ हजार चाचण्या घेण्यात येत आहे. रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा अवधी मुंबईत सध्या २४१ दिवस असून राज्यात २१८ दिवस आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER