कोरोनावर मात करुन अमित ठाकरे मैदानात, शिबिरांना भेट देत मनसैनिकांचे केले कौतुक

Amit Thackeray

मुंबई :- मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र आणि नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांची कोरोना (Corona) चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना २० एप्रिल रोजी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोनातून बरे झाल्यानंतर जवळपास १४ दिवस ते घरीच क्वारंटाइन होते. मात्र आता ते कोरोनाविरोधातील लढ्यात उतरले आहेत. आज त्यांनी मुंबई आणि ठाण्यात मनसेच्या विविध शिबिरांना भेट देऊन सुरू असलेल्या कार्याची पाहणी केली.

मुंबईतील भांडुप येथे नागरिकांना मनसेच्या कोव्हीड मदत कक्षामार्फत मदत पुरवली जात आहे, लसीकरण प्रक्रियेसाठी सहाय्य्य केलं जातं आहे, ज्येष्ठांची लसीकरण केंद्रांपर्यंत ने-आण केली जात आहे. पक्षाकडून सुरू असलेल्याया कार्याची दखल घेत अमित ठाकरे यांनी कक्षाला भेट दिली. लसीकरण नोंदणी व प्लाझ्मा रक्तपेढी मदत केंद्राला भेट देत कामकाजाची माहिती जाणून घेतली. अहोरात्र राबणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांचं कौतुकही केलं. त्यानंतर अमित ठाकरे यांनी ठाण्यातील मनसेच्या ‘कोव्हीड उपचार मदत केंद्रा’स भेट दिली. तर मुंबईतील मुलुंड येथील ‘कोव्हीड उपचार मदत केंद्रा’ ला भेट देत मनसैनिकांचा उत्साह द्विगुनित केला.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button