IPL 2020: बंगळुरूला सहा गड्यांनी पराभूत करून दिल्लीने टॉप २ मध्ये निश्चित केले आपले स्थान

Delhi Capitals defeating Bangalore

अबू धाबी येथे खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२० च्या ५५ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सोमवारी दिल्ली कॅपिटल्स समोर विजय मिळवण्यासाठी १५३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम बंगळुरूला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. बंगळुरूने निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावून १५२ धावा केल्या. आरसीबीकडून सलामी देताना देवदत्त पडिक्क्कलने ४१ चेंडूंत ५० धावांचे योगदान दिले. याशिवाय जोश फिलिपने १२, विराट कोहलीने २९, एबी डिव्हिलियर्सने ३५ आणि शिवम दुबेने १७ धावा केल्या. दिल्लीकडून एनरिच नॉर्टजेने तीन गडी बाद केले, तर कागिसो रबाडाने दोन आणि रविचंद्रन अश्विनने एक गडी बाद केले.

प्रतिउत्तरात दिल्ली कॅपिटल्सने १९ षटकांत ४ गडी गमावून १५३ धावांचे लक्ष्य गाठले. दिल्ली कॅपिटल्स कडून सलामी देताना शिखर धवनने ४१ चेंडूत ५४ धावांचे योगदान दिले. याशिवाय पृथ्वी शॉने ९, अजिंक्य राहणेने ६०, श्रेयस अय्यरने ७ धाव केल्या. रिषभ पंत (८) आणि मार्कस स्टोइनीस (१०) धावा करून नाबाद राहिले.

बंगळुरूने १४ पैकी सात सामने जिंकण्यात यश मिळविले आहे आणि सात सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. दिल्लीनेही आपल्या १४ सामन्यांपैकी आठ सामने जिंकले आहेत आणि सहा गमावले आहेत. अशाप्रकारे, दिल्लीचा संघ १६ गुणांसह दुसऱ्या स्थानी, तर बंगळुरूचा संघ १४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER