चित्तोडगड जिंकल्यानंतर खिलजीनं ३० हजार निष्पाप नागरिकांना मारलं होतं!

Maharashtra Today

इतिहासात क्रुरता या शब्दाला समानअर्थी शब्द म्हणून अल्लाउद्दीन खिलजी (Alauddin Khilji) हे नाव प्रसिद्ध आहे. त्यानं रणथंबोर जिंकल्यानंतर चित्तोडगडकडं (Chittorgarh) आपला मोर्चा वळवला. त्याला वाटलं होतं तितकं हे युद्ध सोप्प नव्हतं. तब्बल आठ महिने सलग त्याला किल्ल्याला वेढा द्यावा लागला होता. चित्तोडचा राजा रतनसिंग (Raja Ratan Singh) यानं पावसाळ्यात सुद्धा खिलजीच्या सैन्याचा प्रतिकार केला होता. अधुनिक हत्यार आणि रतनसिंगांच्यात तुलनेत कित्येक पट जास्त सेना असताना देखिल त्याला किल्ल्यात प्रवेश करायला मोठा संघर्ष करावा लागला होता.

अल्लाउद्दीनचा चित्तोडगडावर हल्ला

राजस्थानच्या मेवात भागात ‘गुहिला’ साम्राज्याचं राज्य होतं. ज्यात चित्तोड राज्याचाही सामावेश होता. १२९९ ला अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती उलुघ खान गुजरातच्या दिशेने सरकत असताना, वाटेत लागणाऱ्या चित्तोडगडावर त्यानं हल्ला चढवला. सन १३०१ भारताच्या इतिहासातलं निर्णायक वर्ष ठरलं होतं. याच वर्षी अल्लाउद्दीन खिलजीनं रणथंबोरचा किल्ला जिंकला जो दिल्ली आणि राजस्थानच्या मध्यावर्ती होता तर याच वर्षी राजस्थानच्या गादीवर ‘महाराज रतनसिंग’ विराजमान झाले.

इतिहासात काही वेगळ्या गोष्टी नोंदवल्या असल्या तरी कवींनी मात्र वेगळचं कल्पना क्षेत्र जगासमोर मांडलं. कवी ‘मलिक मुहम्मद जायसी’ यानं ‘पद्मावती’ ही कविता लिहली. त्यानं या कवितेत अल्लाउद्दीननं या किल्ल्यावर आक्रमण राणी पद्मावतीसाठी केलं असल्याचं लिहंल. पद्मावतीच्या सौंदर्याबद्दल ऐकल्यानंतर त्यानं चित्तोडगडावर चढाई करण्याचा निर्णय घेतला.

२८ जानेवारी १९०३ ला अल्लाउद्दीनं त्याच्या विक्राळ सैन्याला सोबत घेऊन चित्तोडगडाच्या दिशेनं कुच केली. सैन्याल घेऊन किल्ल्याजवळ पोहचल्यानंतर अल्लाउद्दीननं गंभीरी नदीजवळ छावणी टाकली.

आठ महिने किल्ल्याला वेढा दिला

खिलजीच्या सैन्यानं किल्ल्याला चोहो बाजूंनी वेढा दिला. त्यानं सलगआठ महिन्यांसाठी किल्लाची घेराबंदी केली होती. राजा रतनसिंगाच्या कडव्या प्रतिकाराचा दाखला आपल्याला यातून मिळतो. अल्लाउद्दीनचा पराभव होईल हे जवळपास निश्चित झालं होतं. परंतू अल्लाउद्दीननं रणनिती बदलत किल्ल्यावर तुफान तोफेचा मारा केला. तुंबळ युद्ध झालं. अखेर मोठ्या प्रयत्नानंतर अल्लाउद्दीन खिलजी लढाई जिंकू शकला.

३० हजार निष्पाप लोकांचा घेतला बळी

२६ ऑगस्ट १३०३ ला खिलजीनं किल्ला जिंकला. विजय मिळल्यानंतर त्यानं नरसंहाराचा आदेश दिला. अल्लाउद्दीनचा इतिहास त्याच्यासोबत राहून लिहणाऱ्यांपैकी प्रमुख व्यक्ती ‘आमीर खुसरो’ हा कवी होता त्यानं लिहलं की खिलजीनं जवळपास ३ हजार निष्प लोकांची हत्या केली होती. या युद्धात राजा रतनसिंगाचं काय झालं याबद्दल इतिहासकारांच्यात मतभेद आढळतात. काहीजण राजा रतनसिंग युद्धात मारले गेले असं म्हणतात तर काहीजण म्हणतात की त्यांनी शरणागती पत्करली होती. पद्मावत कव्यात दावा करण्यात आलाय की राजा रतन सिंग यांच्या मृत्यू कुंभाल्नरेच्या राजासोबत झालेल्या युद्धातच झाला होता.

चित्तोडगडाच्या विजयानंतर पुढचे सात दिवस खिलजी तिथंच राहिला. यानंतर त्यानं त्याच्या आठ वर्षाच्या मुलाकडं चित्तोडगडाची सुत्र दिली. त्याच्या मुलाचं नाव खिज्र खान होतं. तो लहान असल्यामुळं खिलजीचा गुलाम शाहीन यानं सत्ता सांभाळली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button