बिहारनंतर भाजपचे मिशन हैदराबाद; शेलार-फडणवीसांची जोडगोळी रवाना

Devendra Fadnavis & Ashish Shelar

हैदराबाद : ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका (GHMC) निवडणूक १ डिसेंबरला (hyderabad municipal elections 2020 ) होणार आहे. बिहारनंतर आता फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हैदराबादसाठी कंबर कसली आहे. त्यांच्यासोबत आशिष शेलारही हैदराबाद महापालिका निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी  दोघेही हैदराबादला पोहचले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासारखे भाजपचे दिग्गज नेते हैदराबादेतल्या महापालिका निवडणुकीच्या प्रचारात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बिहारनंतर भाजपनं हैदराबादवर लक्ष केंद्रित केलं आहे. त्यासाठी भाजपनं सर्व ताकद पणाला लावण्यास सुरुवात केली आहे. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हैदराबाद पालिका निवडणुकीत स्टार प्रचारक आहेत.बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपची रणनीती तयार करणारे भूपेंद्र यादव यांच्याकडे हैदराबाद महापालिका निवडणुकांची महत्त्वाची जबाबदारी पक्षाने देण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपच्या उत्तम कामगिरीमुळेच बिहारमध्ये एनडीएचा विजय झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तसेच बिहारचे प्रभारी असलेल्या देवेंद्र फडणवीसांनीही निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना हैदराबादेत धक्का बसला होता. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी आपण एकट्यानं ग्रेटर हैदराबाद महापालिकेची निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

अनेक ठिकाणी तेलंगणा राष्ट्र समितीशी एमआयएमची थेट स्पर्धा आहे. तेलंगणाच्या ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत यंदा तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे, याचा सर्वाधिक फायदा भाजपला होऊ शकतो. कोणत्याही प्रदेशात जेव्हा तिरंगी लढत असते, तेव्हा सर्वाधिक फायदा हा भाजपाला होतो.

कारण विरोधी मतं अनेक भागांत विभागली जातात. ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेत सध्या तेलंगण राष्ट्र समितीची सत्ता आहे. महापालिकेतील एकूण १५० नगरसेवकांपैकी ९९ जागा तेलंगण राष्ट्र समितीकडे आहेत तर एमआयएमला ४४ जागा मिळाल्या आहेत. परंतु ज्या पद्धतीने भाजप वाढत आहे, त्यावरून पक्षाचा पाया मजबूत झाल्याचं स्पष्ट होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER