कोरोनावर मात केल्यानंतर पोलिसांचे जल्लोषी स्वागत

Maharashtra Police - Corona Virus

सातारा : सातारा (Satara) जिल्हा पोलिस दलावर कोरोनाचा (Corona) विळखा घट्ट होत चालला आहे. पोलिस अधिकारी व कर्मचारी बाधित होत असताना अनेकजण त्यावर मात करून पुन्हा सेवेत रुजू होत आहेत. खंडाळा पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केल्यानंतर पोलिस ठाण्यात त्यांचे फटाके फोडून व पुष्पहार घालून जल्लोषी स्वागत करण्यात आले.

सातारा जिल्हा पोलिस दलातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण १६० जण बाधित झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांत पोलिसांना कोरोना होण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. कोरोनाचे संकट गडद होत असतानाच त्याचे उपचार घेऊन बऱ्या होणाऱ्या पोलिसांचे प्रमाण चांगले आहे. पोलिसांना अधिक बळ मिळावे यासाठी खंडाळा पोलिसांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. कोरोनावर मात करून आलेल्या पोलिसांची पोलिस ठाण्यात एंट्री होताच पोलिस ठाण्याबाहेर फटाक्यांची माळ लावून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर कोरोना योद्धाना फुलांची माळ घालून त्यांचे औक्षण करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER