बार्टी, सारथी,महाजोतिनंतर आता धनगरांची ‘आर्टी’ंची मागणी ; पडळकर सरसावले

Gopichand Padalkar

अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी फार पूर्वीपासून बार्टी ही संस्था पुण्यात कार्यरत आहे. त्याच धर्तीवर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारच्या काळात सारथी ही संस्था स्थापन करण्यात आली. बार्टी आणि सारथीचे मुख्यालय पुण्यातच आहे. ओबीसी समाजाच्या (OBC Community) कल्याणासाठी महाजोति ही संस्था स्थापन करण्यात आली. आता धनगर व इतर भटक्या विमुक्त जमातींच्या कल्याणासाठी पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) स्थापन करण्याची मागणी पुढे आली आहे.

भाजपचे विधान परिषद सदस्य आणि धनगर समाजाचे (Dhangar Community) नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे.

पडळकर यांनी या पत्रात म्हटले आहे की, आर्टी या संस्थेची स्थापना करून तिला स्वायत्त दर्जा देण्यात यावा. समाजाच्या विकासासाठी योजना, उपक्रम राबविण्याचे स्वातंत्र्य या संस्थेला असावे. या संस्थेत संशोधन, प्रशिक्षणाचे कार्य चालावे, धनगर समाज व इतर भटक्या विमुक्त जमातींच्या कल्याणासाठी योजनांना गती द्यावी असे पडळकर यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER