महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंनंतर फायरब्रँड एकच….राज ठाकरे; मनसे नेत्याचे वक्तव्य

Raj Thackeray

मुंबई : “महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल. ” अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना साद घातली आहे . मात्र, राऊत यांच्या या भूमिकेवर मनसे नेत्यांनी टीकास्त्र सोडले आहे . याअगोदर संदीप देशपांडे (Sandeep Deshpande), त्यानंतर आता मनसेच्या सिनेमा विंगचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी राऊत यांना खडेबोल सुनावले आहे.

“शॅडो संपादक महाशय, अगदी रोखठोकपणे सांगायचे तर महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर फायरब्रँड एकच…राजसाहेब ठाकरे. ” अशा शब्दांत खोपकर यांनी संजय राऊत यांना उत्तर दिले आहे. तसेच “सगळीकडून कोंडीत सापडलात म्हणून लगेच तुम्हाला ठाकरे ब्रँडचं कसं होणार अशी चिंता वाटत असली तरी ती तुमच्यापर्यंतच ठेवा. मनसैनिकांना राज ठाकरे या ब्रँडबद्दल, त्यांच्या लोकप्रियतेबद्दल कधीही शंका नव्हती आणि भविष्यात कधी असणार नाही. तुम्ही तुमचा स्वाभिमान गुंडाळून ठेवलाय, पण त्यात आमच्या राजसाहेबांना खेचू नका. एक मात्र खरं, तुमचा आवाज, लेख सगळीकडे व्हायरल झालाय तो राजसाहेबांच्या उल्लेखामुळेच, हे ध्यानात असू द्या, असेही खोपकर संजय राऊत यांना म्हणाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER