अर्णबनंतर पोलिसांचा आणखी दणका, फिरोज शेख, नितेश सारडा पोलिसांच्याअटकेत

Arnab Goswami.jpg

मुंबई : अलिबाग जिल्ह्यातील इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज पहाटे अटक केल्यानंतर नाईक यांच्या चिठ्ठीत नावे असलेले फिरोज शेख, नितेश सारडा यांनाही पोलिसांनी सायंकाळी अटक केली आहे.

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना आज सकाळी ७ वाजता अटक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप अर्णब यांनी केला होता. तो रायगडमधील न्य़ायालयाने फेटाळला आहे. मात्र, या वेळी अर्णब गोस्वामीने कारवाईवेळी आलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. सध्या तिघांचीही रायगडच्या न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER