अनिल देशमुख यांच्यानंतर नंबर अनिल परब यांचा – किरीट सोमय्या

kirit somaiya - anil parab - Maharashtra Today

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयनंतर आता सक्तवसुली संचालनालयानेही (ईडी) गुन्हा दाखल केला. यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. यानंतर भाजपाचे (BJP) नेते किरीट सोमय्या यांनी – अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यानंतर नंबर अनिल परब यांचा, असे ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे.

सीबीआयने (CBI) भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली अनिल देशमुखांविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द केला जावा अशी मागणी करणारी याचिका अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात केली आहे. या याचिकेला न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

तपास ED कडे गेला हे उत्तम
किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ट्विटरला व्हिडीओ शेअर करत आता अनिल परब यांचा नंबर लागणार असल्याचा इशारा दिला आहे. “ईडीने अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. १०० कोटींहून अधिक कोटींची अफरातफर आहे. अनेक बोगस कंपन्या, कोलकातामधून पैसा आला, वाझे वसुली गँगचा हिस्सा असो किंवा २०१०, २०१२ चा पैसा असो…अनिल देशमुख यांना हिशेब द्यावा लागणार. आता पुढे अनिल परब (Anil Parab) यांचाही नंबर लागणार आहे. ” असे सोमय्या म्हणालेत.

Disclaimer:-बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button