
मुंबई :- भाजपचे (BJP) माजी अध्यक्ष, केंद्रिय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या महाराष्ट्र दौ-याचा खुप गाजावाजा झाला होता. अमित शहांच्या कोकण दौ-यानंतर राज्यात सरकारमध्ये अधिक अस्थिरता येईल अशी भाकितं अनेकांनी रंगवली. मात्र, शहांच्या दौ-यानंतर कोंकणात (Konkan) काहीसे उलट चित्र दिसून येत आहे असेच म्हणावे लागेल.
ही बातमी पण वाचा : ‘तुमच्या नंगेपणास कोकणातील भुतेही घाबरत नाहीत’ ; शहांच्या कोकण दौ-याची शिवसेनेने उडवली खिल्ली
केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोकण दौऱ्यानंतर कोकणात शिवसेनेने (Shiv Sena) भाजपला मोठा धक्का दिला आहे. वैभववाडीतील भाजपचे सात नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. वैभववाडी नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या तोंडावर ही राजकीय उलथापालथ होत आहे. त्यामुळे हा भाजपसाठी खुप मोठा धक्का मानला जात आहे. एबीपी माझाने हे वृत्त ट्वीट केले आहे.
#BREAKING अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर कोकणात शिवसेनेचा भाजपला मोठा धक्का
वैभववाडीतील भाजपचे सात नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार
वैभववाडी नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय उलथापालथ @MeNarayanRane @AmitShah #Konkan pic.twitter.com/vuzOklGtWt
— ABP माझा (@abpmajhatv) February 9, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला