राष्ट्रवादीची प्रतिक्रिया : संजय राऊतांना कोणतेही अधिकार नाहीत; सरकारमध्ये शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची

राऊत-फडणवीस भेट : शिवसेना एकटी सरकार चालवत नाही; राष्ट्रवादीने करून दिली आठवण

Uddhav Thackeray & Sharad Pawar

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. चर्चांना उधाण आले आहे. एवढेच नाही तर शिवसेना असे करून कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचेही बोलले जात आहे. या सर्व बाबींवर राष्ट्रवादीच्या नेत्याकडून प्रतिक्रिया आली आहे. महाविकास आघाडी सरकार हे एकटी शिवसेना चालवत नाही, अशी आठवण राष्ट्रवादीने सेनेला करून दिली आहे. एवढेच काय तर, या सर्व बाबींवर शांत मुद्रेने पाहणारी राष्ट्रवादी अखेर बोलली व शिवसेनेला पवारांच्या नेतृत्वाची आठवण करून दिली.

‘संजय राऊत यांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी असा कोणताही राजकीय अधिकार दिलेला नाही. मुळात शरद पवार (Sharad Pawar) हे महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) समन्वयाची भूमिका पार पाडत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला कोणताही धोका नाही.’ असेही माजिद मेमन यांनी स्पष्ट केले. तसेच माजिद मेमन म्हणाले, संजय राऊत – फडणवीस भेटीची माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे; पण ही त्यांची व्यक्तिगत किंवा सामाजिक भेट असेल. या भेटीचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही; कारण शिवसेना ही काही एकटी सरकार चालवत नाही तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस त्यांच्यासोबत आहे. त्याचबरोबर, ‘शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे कायम चर्चेत राहात असतात. दररोज या ना त्या मुद्द्यावरून ते कायम बातम्यांमध्ये दिसत असतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जितके चर्चेत राहात नाहीत, तितके राऊत चर्चेत असतात.’ असा टोलाही मेमन यांनी लगावला.

फडणवीस भेटीवर राऊत यांचा खुलासा

‘देवेंद्र फडणीस हे राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना भेटणे हे काही गुप्तपणे नाही. ही काही बंकरमध्ये भेट नव्हती. त्यांच्याशी बऱ्याच दिवसांपासून भेटण्याचा विचार होता. त्यांची जाहीरपणे मुलाखत घेण्याचा विचार होता. याआधीही शरद पवार यांचीही मुलाखत घेण्याचा विचार होता; पण कोरोनाच्या काळामुळे ती झाली नाही. आता फडणवीस यांची मुलाखत घेण्याचा विषय आला आहे. महाराष्ट्रातील काही साहित्यिक संस्था आहेत. त्यांनीही फडणवीस यांची प्रकट मुलाखत घ्यावी असा आग्रह केला आहे.’ असंही राऊत यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER