अखेर मुंबई महापालिका शिवसेनेच्या हातात, स्थायी समितीचे अध्यक्षपद शिवसेनेकडे

BMC-Shivsena

मुंबई : मुंबई पालिकेतील (BMC) स्थायी आणि शिक्षण समिती अध्यक्षपदाची निवडणूक आज होत आहे. मात्र काँग्रेस पक्षाने महा विकास आघाडीचा धर्म पाळत दोन्ही पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे या दोन्ही समित्यांचे अध्यक्षपद शिवसेनेकडे राहण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. काँग्रेस घेतलेल्या माघारीमुळे आत मुंबई महापालिकेच्या सर्वच समित्यांवर शिवसेनेचे (Shivsena) सदस्य राहतील. त्यामुळे महापालिका शिवसेनेच्या हातात राहणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही समित्यांच्या अध्यक्षपदासाठी शिवसेना, भाजप, काँग्रेसने उमेदवार उभे केले आहेत. तिरंगी होणाऱ्या लढतीत शिवसेनेकडे अधिक संख्याबळ आहे. पदरी संख्याबळ अधिक असले तरी आयत्या वेळी भाजपने काही वेगळी खेळी केली तर अध्यक्षपद गमवावे लागेल अशी चिंता सत्ताधारी शिवसेनेला होती. तर दुसरीकडे उमेदवारी मागे घ्यायची की निवडणूक लढवायची असा पेच काँग्रेससमोर होता. मात्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि शिवसेनेच्या नेत्यांनी चर्चा करत यावर मार्ग काढला. आणि दोन्ही समित्यांच्या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला.

या दोन पदावरून राज्यातील महाविकास आघाडीत फूट पडायला नको म्हणून काँग्रेसने आज महापालिकेतील शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारीचा अर्ज मागे घेतला. सोबतच स्थायी समितीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मतदानाच्या वेळी काँग्रेस तटस्थ राहील, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष शिवसेनेला मतदान करणार आहेत. काँग्रेसने अर्ज मागे घेतला नसता तर भाजपने काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देऊन शिवसेनेच्या वर्चस्वाला आव्हान उभे केले असते अशी चर्चा रंगली होती. मात्र आता आता शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या संध्या दोषी, तर स्थायी समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे यशवंत जाधव यांची वर्णी लागणार आहे.

ही बातमी पण वाचा : अखेर शिवसेना आणि काँग्रेसचं ठरलं, मुंबई महापालीतील तिजोरीची चावी शिवसेनेकडेच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER