अजित पवारांनंतर राष्ट्रवादीच्या आणखी एका मोठ्या नेत्याला कोरोनाची लागण

Sunil Tatkare - Corona Positive

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना कोरोनाची (Corona) लागण झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) आणखी एका मोठ्या नेत्याला कोरोना संसर्ग झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तटकरे यांनी कोरोना संसर्ग झाल्याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे.

सुनील तटकरे यांची सोमवारी कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मी मुंबईतील रुग्णालयात दाखल झालो आहे, असं तटकरे यांनी म्हटलं आहे. सुनील तटकरे मुंबईतील कोरोना रुग्णालयात दाखल झाले आहेत. कोरोनातून लवकर बरं होऊन पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू होणार आहे, असं तटकरेंनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER