वर्षभरानंतर मिळाला विधिमंडळ समित्यांना मुहूर्त

- शिवसेनेचा वरचष्मा, राष्ट्रवादी क्रमांक ३ वर

Maharashtra Legislature

मुंबई :- महाराष्ट्र विधिमंडळाच्या विविध समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्य नेमण्यास राज्यातील लोकशाही आघाडी सरकारला एक वर्षानंतर का होईना पण वेळ मिळाला आहे. या समित्याच आतापर्यंत अस्तित्वात नसल्याने विधिमंडळाच्या अधिवेशनाव्यतिरिक्त चालणाऱ्या कामकाजाला खिळ बसली होती.

या समित्यांपैकी एकच समिती अशी आहे जिचे अध्यक्षपद हे विरोधी पक्षाकडे परंपरेने जाते. यावेळी हे अध्यक्षपद माजी वित्त मंत्री आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांना देण्यात आले आहे. ही समिती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. उर्वरित १६ समित्यांपैकी शिवसेनेच्या वाट्याला ७, काँग्रेसच्या वाट्याला ५ तर राष्ट्रवादीच्या वाट्याला ४ समित्यांचे अध्यक्षपद गेले आहे.

उर्वरित समित्यांचे अध्यक्ष असे –

 • सुधीर मुनगंटीवार – लोकलेखा समिती (भाजप)
 • मनोहर चंद्रिकापुरे – रोजगार हमी समिती (राष्ट्रवादी)
 • संजय रायमूलकर –  पंचायत राज समिती (शिवसेना)
 • अशोक पवार – सार्वजनिक उपक्रम समिती (राष्ट्रवादी)
 • कैलाश गोरंट्याल – आश्वासन समिती (काँग्रेस)
 • रणजित कांबळे -अंदाज समिती (काँग्रेस)
 • प्रणिती शिंदे -अनुसूचित जाती कल्याण समिती (काँग्रेस)
 • दौलत दरोडा – अनुसूचित जमाती कल्याण समिती (राष्ट्रवादी)
 • मंगेश कुडाळकर – इतर मागासवर्ग कल्याण समिती (शिवसेना)
 • शांताराम मोरे – भटक्या विमुक्त जाती कल्याण समिती (शिवसेना)
 • अमिन पटेल – अल्पसंख्यांक कल्याण समिती (काँग्रेस)
 • चेतन तुपे -मराठी भाषा समिती (राष्ट्रवादी)
 • दीपक केसरकर – हक्कभंग समिती (शिवसेना)
 • आशिष जयस्वाल -उपविधान समिती अपक्ष (शिवसेना सहयोगी)
 • नरेंद्र भोंडेकर – अशासकीय ठराव समिती अपक्ष (शिवसेना सहयोगी)
 • राजन साळवी -आहार व्यवस्था समिती (शिवसेना)
 • सरोज अहिरे -महिला हक्क समिती(राष्ट्रवादी)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER