महिनाभरानंतर कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं, दिवसभरात ४०५ जणांचा मृत्यू

Maharashtra Coronavirus

मुंबई : राज्यात कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ अजुनही कायम आहे. शुक्रवारी दिवसभरात २१ हजार ६५६ नवे रुग्ण आढळून आले. तर ४०५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात २२ हजार ७८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तब्बल महिनाभरानंतर रुग्ण बरे होण्याची संख्या वाढली. नव्याने सापडलेल्या रुग्णापेक्षा बरे झालेले रुग्ण आज अधिक. बरे होण्याच्या रुग्णाची टक्केवारी ७१. ४७ टक्के एवढी झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची एकूणसंख्या ११ लाख ६७ हजार ४९३ एवढी झाली आहे.

दिवसभरात ४३४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे तर ४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना बाधित झालेल्या पोलिसांची एकूण संख्या ही २०,८०१ एवढी झाली आहे. राज्यभरात सध्या ३,८८३ पोलिसांवर उपचार सुरू आहेत. १६,७०६ पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत २१२ पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५६ लाख ९३ हजार ३४५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ११ लाख ६७ हजार ४९६ नमुने पॉझटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १७ लाख ७८ हजार ७९२ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३६ हजार ७६७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज ३ लाख ८८७ अ‌ॅक्टिव्ह केसेस आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER