लोकसभेतील रोखठोक भाषणानंतर अमोल कोल्हे पवारांच्या भेटीला, पी. चिदंबरम, सुप्रिया सुळेही उपस्थित!

Supriya Sule - Amol Kolhe - Sharad Pawar - P. Chidambaram

नवी दिल्ली : अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी सोमवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना मोदी सरकारला (Modi Government) चांगलेच धारेवर धरले. त्यांनी शेतकरी आंदोनावरुन (Farmers Protest) सरकारला खडेबोल सुनावले. तसेच राष्ट्रपतींच्याच भाषणातील मुद्दे घेत त्यावर भाष्य करत मोदी सरकारची चांगलीच कोंडी केली. यावेळी त्यांनी शेतकरी प्रश्नावर सन्मानजनक तोडगा काढण्यासाठी सरकारने पुढे यावं, असं आपल्या भाषणातून सांगितलं. देशभर काल अमोल कोल्हेंच्या भाषणाची चर्चा होती.

या रोखठोक भाषणानंतर खासदार अमोल कोल्हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीसाठी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी गेले. या भेटीवेळी देशाचे माजी गृहमंत्री तसंच काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम (P. Chidambaram), राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) उपस्थित होत्या. या भेटीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याची प्रतिक्रिया बैठकीनंतर अमोल कोल्हे यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER