अजय देवगणसोबतच्या हॅटट्रिकनंतर इंद्रकुमारने अजयसोबत सुरु केला ‘थँक गॉड’

Indra Kumar - Ajay Devgan - Thank God

निर्माता-दिग्दर्शक इंद्रकुमारने (Indra Kumar) आजवर वेगळ्या विषयावरील अनेक हिट सिनेमे दिले आहेत. आमिर खानच्या (Aamir Khan) कारकिर्दीत त्याला लोकप्रियता मिळवून देणार ‘दिल’ सिनेमाही इंद्रकुमारनेच तयार केला होता. हा सिनेमा सुपरहिट झाला होता. अनिल कपूरसोबत (Anil Kapoor) बेटा आणि संजय कपूरसोबत (Sanjay Kapoor) केलेला राजा हे सिनेमेसुद्धा बॉक्स ऑफिसवर हिट झाले होते. इंद्रकुमारने गेल्या काही वर्षात अजय देवगणसोबत (Ajay Devgan) ‘इश्क’, ‘मस्ती’ आणि ‘टोटल धमाल’ हे हिट सिनेमेही दिले होते. अजय देवगणसोबत हिट सिनेमाची हॅटट्रिक केल्यानंतर इंद्रकुमार आणि अजय देवगण पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. इंद्रकुमारच्या ‘थँक गॉड’ सिनेमात काम करणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच अजयने सोशल मीडियावरजाहीर केले होते. आम्ही आमच्या वाचकांना ही बातमी दिली होतीच. या थँक गॉड सिनेमाचा गुरुवारी मुंबईत मुहुर्त करण्यात आला.

गुरुवारी मुंबईत झालेल्या सिनेमाच्या मुहुर्ताला इंद्रकुमारचे अभिनंदन करण्यासाठी निर्माता भूषण कुमार, सह निर्माता विनोद भानुशाली, मार्कंड अधिकारी, रुद्र पंडित, अशोक ठाकरिया, बालू मुन्नांगी, सुनीर खेत्रपाल, दीपक मुकुट आणि शिव चाननाही उपस्थित होते. मुहुर्ताची क्लॅप बालू मुन्नांगीने दिली. या सिनेमात अजय देवगणसोबत सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत सिंह यांच्याही भूमिका आहेत. इंद्रकुमारच्या मागील सिनेमांप्रमाणेच हा सिनेमासुद्धा एक रोमँटिक कॉमेडी जॉनरचा आहे.

अजय देवगणने पन्नाशी पार केली असली तरी तो तरुण नायिकांसोबत काम करीत आहे आणि विशेष म्हणजे या तरुण नायिकांसोबत त्याची जोडी प्रेक्षकांना आवडतही आहे. अजयने इलियाना डिक्रूजसोबत दोन सिनेमे केले होते आणि आता रकुल प्रीतसोबतही दुसरा सिनेमा करीत आहे. ‘दे दे प्यार दे’ सिनेमातील रकुल आणि अजयची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली होती. या दोघांचे चांगले ट्यूनिंग असल्याने अजयने त्याच्या ‘मे डे’ सिनेमात मुख्य भूमिका साकारण्यासाठी रकुलचीच निवड केली आहे. अजयकडे सध्या तीन-चार चांगले आणि मोठे सिनेमे असून यावर्षी त्याचे तीन-चार नवे सिनेमे रिलीज होणार आहेत. त्याचा महत्वाकांक्षी भुज- द प्राईड ऑफ इंडिया मात्र ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाणार आहे. ‘थँक गॉड’चे शूटिंग लवकरात लवकर पूर्ण करून याच वर्षी हा सिनेमा रिलीज करण्याचा इंद्रकुमारचा विचार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER