गोपीनाथ मुंडेंनंतर नऊ वर्षांनी तोच मुद्दा प्रीतम  मुंडेंनी उचलून धरला

Pritam Munde

नवी दिल्ली : वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत पंकजा मुंडे आणि त्यानंतर प्रीतम मुंडे यांनी राजकारणात भरारी घेतली आहे. नऊ  वर्षांपूर्वी  लोकसभेत दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी ज्या मुद्याला लावून धरले होते तोच मुद्दा आता त्यांची कन्या बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी उचलून धरला आहे.

हि बातमी पण वाचा : व्यापक प्रयत्नातून महाराष्ट्र लवकरच कुपोषणमुक्त करू – पंकजा मुंडे

राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा (Draft National Education Policy 2019 – NEP) मसुदा तयार करण्यात येत आहे. त्यासाठी सूचना मागवण्यात येत आहेत. यावर लोकसभेत बोलताना डॉ. प्रीतम मुंडे यांनी उर्दू भाषेसाठी आग्रही मागणी केली. एनईपीमध्ये हिंदी, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषेचा समावेश असेल. त्यासोबतच आपल्या संस्कृतीचा समावेश असलेल्या उर्दू भाषेचाही काही विचार आहे का, असा प्रश्न त्यांनी संबंधित मंत्रालयाला केला.

हि बातमी पण वाचा : जि.प.अंतर्गत रस्ते सुधारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे प्रस्ताव पाठविणार- पंकजा मुंडे

मुस्लिम  बांधवांच्या अस्मितेचा विषय असलेला प्रश्न प्रीतम मुंडेंनी उपस्थित केला. ५ ऑगस्ट २०१० रोजी बोलताना गोपीनाथ मुंडे यांनीही हाच प्रश्न उपस्थित केला होता. उर्दू भाषा ही देशाची भाषा आहे, कुठल्या धर्माची भाषा नाही. उर्दूचं महत्त्व जाणून घेऊन या भाषेवरील अन्याय दूर केला पाहिजे, अशी मागणी गोपीनाथ मुंडेंनी केली होती.