२२ वर्षांनंतर प्रभुदेवाला कमल हसनसोबत मिळाली काम करण्याची संधी

Kamal Haasan- Prabhu Deva

दिग्गज अभिनेता कमल हसन (Kamal Haasan) आणि प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक प्रभुदेवा (Prabhu Deva) २२ वर्षांनंतर एकत्र पडद्यावर जात आहेत. कमल हसन यांनी या चित्रपटासाठी दिग्दर्शक लोकेश कनगराज यांचे नाव यापूर्वीच निश्चित केले आहे. या अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटाचे नाव ‘विक्रम’ असून या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. या चित्रपटात प्रभुदेवा एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ‘विक्रम’ हा चित्रपट बनविण्याचा सराव सुरू झाला. त्यानंतर कमल हसन यांची कंपनी राज कमल फिल्म्स इंटरनेशनल या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी लोकेशला साइन केले. कमल त्यावेळी इतर कामांमध्ये व्यस्त होते आणि लोकेशही इतर कामांना प्राधान्य देत होते. जेव्हा दोघेही आपल्या कामात व्यस्त होते तेव्हा चित्रपटाच्या शूटिंगला लवकर सुरुवात करता आली नव्हती.

जेव्हा कोरोना विषाणूने सर्व मनोरंजन क्रिया थांबविल्या तेव्हा चित्रपटाच्या प्रारंभास (Launching) उशीर झाला. या वर्षी सप्टेंबरमध्ये कोरोना विषाणूमुळे होणारा लॉकडाऊन संपल्यानंतर लोकेशने जाहीर केले की, एक अ‍ॅक्शन थ्रिलर फिल्म बनवणार असून त्यात कमल हसन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे शीर्षक ‘एवानेन्द्रू निनैथाई’ असे सांगण्यात आले. चित्रपटाचे कामही ऑक्टोबर महिन्यात सुरू झाले होते आणि आरोग्य सुरक्षेसंबंधित व्यवस्थेची दखल घेऊन चित्रपटाचा टीझरही शूट करण्यात आला होता. आता नोव्हेंबरमध्ये निर्मात्यांनी निर्णय घेतला की या चित्रपटाचे अंतिम शीर्षक ‘विक्रम’ असेल. ‘विक्रम’साठी कमल हासन यांच्या नावाची घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे आणि फहद फाजिल या चित्रपटात मुख्य खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

त्याचबरोबर या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारण्यासाठी प्रभुदेवाचीही निवड झाली आहे. कित्येक वर्षांनंतर, प्रेक्षकांना कमल हसन आणि प्रभुदेवा एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसतील. दोघांना अखेर १९९८ साली तमिळ भाषेच्या कॉमेडी फिल्म ‘काढाला काढाला’ मध्ये एकत्र पाहिले होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लोकेशने ‘विक्रम’ चित्रपटाची कथा तमिळ सुपरस्टार रजनीकांत यांनाही सांगितली होती. त्यावेळी कमल हसन या चित्रपटात अभिनय करणार नव्हते, तर फक्त निर्मात्याची भूमिका करणार होते. तथापि याच्यावर सहमती होऊ नाही शकली आणि रजनीकांतची एन्ट्री या चित्रपटात नाही झाली. आता लोकेश हा चित्रपट कमल हसन यांच्यापासून सुरू करणार आहे. लोकेश हे ‘मास्टर’ या प्रसिद्ध चित्रपटाचे दिग्दर्शकही आहेत. पोंगलवर रिलीज होणार्‍या याचित्रपटात थलपति विजय आणि विजय सेतुपती मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER