16 वर्ष आणि 28 चित्रपटानंतर या नायकाने केला 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश

Shahid Kapoor

चित्रपटसृष्टीत तुम्ही कोणाचे नातेवाईक, कोणाचा मुलगा आहात म्हणून चित्रपट मिळतील परंतु यश मिळवणे हे केवळ गुणांवरच अवलंबून असते. त्यामुळेच अनेक मोठ्या नायकांची मुले नायक झाली खरी परंतु लवकरच चित्रपटसृष्टीबाहेर फेकलीही गेली. कारण येथे संघर्ष करणे हे सोपे काम नाही.

शाहीद कपूर (Shahid Kapoor) भलेही प्रख्यात अभिनेता पंकज कपूर (Pankaj Kapoor) यांचा मुलगा असेल परंतु त्याने एक्स्ट्रा म्हणून चित्रपटसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली होती. सुभाष घई यांच्या ताल चित्रपटातील एका गाण्यात तो ऐश्वर्याच्या मागे नाचताना दिसला होता. दिल तो पागल है मध्येही तो एका समूहनृत्यात होता. तेथून प्रगती करीत 2003 मध्ये त्याने इश्क विश्क चित्रपटातून नायक म्हणून रुपेरी पडद्यावर आगमन केले. त्याचा अभिनयही चांगला होता त्यामुळे त्याला काही चित्रपट मिळालेही.

परंतु त्याच्या चित्रपटाने यश मात्र म्हणावे तसे मिळवले नव्हते. तो अजून यशासाठी चाचपडतच होता. परंतु गेल्या वर्षी त्याने दक्षिणेतील एका चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम केले आणि प्रथमच त्याने 100 कोटी क्लबमध्ये पाऊल टाकले. हा चित्रपट होता कबीर सिंह. चित्रपटाबाबत खूप बरी वाईट चर्चा झाली परंतु बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने कमाल केली होती. हे यश मिळवायला शाहीद कपूरला 16 वर्ष लागली आणि त्याासाठी 28 चित्रपटांमध्ये काम करावे लागले होेते. शाहीदने संघर्ष करताना हार न मानल्यानेच यश त्याच्याकडे चालून आले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER