युरोपात १३ वर्ष युद्ध प्रशिक्षण घेतल्यानंतर ‘नाईट’ पदवी मिळायची!

Maharashtra Today
  • इतिहासात योद्धा ही उपाधी मिळवण्यासाठी लावावी लागली होती जीवाची बाजी

गेम ऑफ थ्रोन्समध्ये(Game of Thrones) मध्ययुगीन इतिहासाचा आधार घेऊन रंगवलेल्या कथानकांमध्ये ‘नाइट'(Knight) म्हणजेच योद्धा ही पदवी मिळवण्यासाठी करावी लागणारी धडपड दाखवण्यात आली आहे. अनेक पात्रं यामध्ये महत्त्वपुर्ण आहेत. त्यांच्या आयुष्याचा मोठा भाग योद्धा म्हणजेच नाइट बनण्यासाठी त्यांनी खर्ची घातलेला असतो. युरोपच्या मध्ययुगीन इतिहासाचं चित्र वास्तवातही तसंच होतं. मध्ययुगीन युरोपात ‘योद्धा’ म्हणजेच ‘नाइट’ही उपाधी मोठी सन्मानाची गोष्ट होती. नावापुढं ही उपाधी लागावी म्हणून अनेक जण जिवाची बाजी लावायचे. एक काळ असा आला जेव्हा राजासह सामान्य लोकांना ही उपाधी देऊ जाऊ लागली. ही उपाधी मिळवण्यासाठी बालपणापासून मोठे प्रयत्न करावे लागायचे. तर दुसऱ्या टप्प्यात त्यावेळच्या योद्ध्याची सेवा करावी लागायची.

सात वर्षांचं असायचं प्रशिक्षण

युरोपात १३ व्या शकताच्या सुरुवातीला योद्धा हा वंश परंपरेनं चालणारी उपाधी(13 years of war training in Europe) होती. फ्रान्स आणि जर्मनीशिवाय इतर युरोपात फक्त योद्ध्याचा मुलगाच योद्धा बनायचा. मध्य युगात योद्धा बनण्याचं प्रशिक्षण सामान्यपणे राजाच्या आणि त्याच्या सैन्यातल्या ठरावीक योद्ध्यांच्या मुलांना मिळत होतं. नंतर सामान्य माणसांना योद्धा बनण्याचं प्रशिक्षण मिळू लागलं. योद्धा ही उपाधी मिळवण्यासाठी तलवारीबाजी पासून ते घोडेस्वारी पर्यंतच सर्व कलांमध्ये त्यानं पारंगत असलं पाहिजे. योद्धा म्हणून तयार होणाऱ्या लहान मुलाला त्याच्या आयुष्यातली सहा वर्षे प्रशिक्षणात खर्च करावी लागायची. शिकारीपासून ते गरुड पालनापर्यंत सर्व गुण त्याला शिकवले जात. धर्माचं शिक्षण देणारे पुजारी त्याला वाचन आणि लिखान ही शिकवत.

योद्ध्याचा सेवक म्हणून जबाबदारी पार पाडावी लागायची

वयाच्या सात वर्षापासून ते पुढं १३ वर्षापर्यंत खडतर प्रशिक्षणाला सामोर जावं लागायचं. यानंतर धार्मिक परंपरेनुसार त्याला पवित्र तलवार धर्मगुरु कडून मिळायची. धार्मिक सन्मानासाठी आणि धर्माच्या रक्षणासाठी ही तलवार तो चालवेल अशी शपथ त्यावेळी त्याला घ्यायला लागायाची. ही शपथ घेतल्यानंतर सरदारांचा सेवक म्हणजेच ‘स्कवायर’ म्हणून त्याला सेवा देणं भाग होतं. यात वेगवेगळ्या ठिकाणी द्यायच्या सेवेवरुन त्यांच नामकरण केलं जायचं. सक्वायर ऑफ द बॉडी, सक्वायर ऑफ द चेंबर, स्कावयर ऑफ द आर्म्स, स्क्वायर ऑफ द ऑनर अशी नावं असायची.

युद्धाचं प्रशिक्षण

युद्ध कुशलतेसोबतच त्याला विविध कलाही शिकवल्या जायच्या. संगित, डान्स, फ्रेंच आणि लॅटीन भाषा वाचणं, लिहनं, कविता सादर करणं अशा कलागुणांना एका योद्ध्यामध्ये पहाणं लोकांना बरंच सोईच वाटायचं. या सोबतच महिलांसोबत बुद्धीबळाचा डाव खेळणं आणि त्यांना शिकारीला घेऊन जाणं या कला ही त्यात सामील होत्या. स्क्वायरचं प्रशिक्षण घेताना शिकलेल्या तलवार बाजीला प्रत्यक्षात उतरण्यासाठी युद्धात सहभाग घ्यावा लागायचा. लढाईच्या मैदानात त्यांचा सहभाग जीवाची बाजी लावण्याचा प्रकार असे. एखाद्या युद्धाच्या वेळी त्यांना लढाई करण्याच्या आणि यासोबतच सरदारांना सेवा देण्याच्या दोन्ही आघाड्यांवर काम करावं लागायाचं. यानंतर बऱ्याच लढायांमध्ये दाखवलेल्या कौशल्याच्या आणि पराक्रमाच्या जोरावर त्यांना ‘नाइट’ म्हणजेच योद्धा ही पदवी मिळायची.

आणि योद्ध्याची पदवी मिळायची

योद्धा ही पदवी १८ ते २१ वर्षांच्या दरम्यान मिळायची. एका स्क्वायरला नाइट आणि नंतर लॉर्ड म्हणजेच सरदार बनवलं जायचं. नाइटची उपाधी ही अंतिम उपाधी असायची. ही पदवी बहाल करण्यासाठी प्रथेप्रमाणं मोठ्या जल्लोषात समारंभ आयोजित केला जायचा. यादिवशी तो डोक्यावरचे केस पुर्ण काढत असते. दाढी कमी करत असे. तासंतास चर्चमध्ये बसून भविष्याबद्दल त्याला चिंतन करावं लागायचं. शिवाय त्यांना लाल रंगाचे वस्त्र दिलं जायचं. राजमहालात एखाद्याला नाइट ही पदवी देण्याचा समारंभ पार पडायचा. एखाद्या लढय्यासाठी तो दिवस मोठा आनंदाचा आणि उत्साहाचा असायाचा त्याला योद्धाही पदवी मिळायची आणि राज्याला जीवाची बाजी लावणारी तलवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button