११ वर्षांनंतर दिल्ली आणि बंगळुरू हे दोन्ही संघ एकत्र प्ले ऑफसाठी झाले क्वालिफाय

RCB - DC

सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) पराभव करून दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. आरसीबीला पराभूत केल्यानंतर दिल्लीचा संघ पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहून क्वालिफायर १ मध्ये पोहोचला. दिल्लीच्या विजयासह विराटच्या (Virat Kohli) नेतृत्वात बंगळुरूनेही गुण आणि रन रेट सह प्लेऑफमध्ये प्रवेश केला.

गेल्या काही सत्रांमध्ये ग्रुप स्टेज मधूनच बाहेर होत असलेल्या या दोन्ही संघांनी यावेळी शानदार प्रदर्शन करत बाद फेरी गाठली. यासह एक विशेष योगायोग देखील बनला दिल्ली आणि बंगळुरूच्या संघांनी २००९ नंतर पुन्हा एकत्र प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.

तेव्हाही आयपीएल २००९ मध्ये दोन्ही संघ पहिल्या चारमध्ये होते आणि पुढच्या फेरीत पोहोचले. त्यावेळी दिल्लीने २० गुणांसह अव्वल स्थान मिळविले आणि बंगळुरूचा संघ तिसर्‍या क्रमांकावर होता. यावर्षीही दिल्ली संघाने दुसरे स्थान मिळविले आहे आणि बंगळुरूचा संघ तिसर्‍या / चौथ्या स्थानावर असेल.

आणखी एक विशेष योगायोग असा आहे की त्यावेळी आयपीएलचे आयोजनदेखील देशाबाहेर होते. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेत ही स्पर्धा आयोजित केली गेली होती आणि यंदा युएईमध्ये होत आहे. त्यानंतर दिल्लीचा संघ उपांत्य फेरीत पराभूत झाला आणि डेक्कन चार्जर्स विजेता ठरला होता, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ उपविजेत होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER