अफगाणिस्तान : २४ तासांत १०० पेक्षा जास्त दहशतवादी मारले

AFGHANISTAN

काबुल : अफगाणिस्तानमध्ये दहशतवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या धडक कारवाईत २४ तासात अफगाणिस्तानच्या सैनिकांनी १०० पेक्षा अधिक दहशतवाद्यांना ठार केले.

जवानांकडून दहशतवाद्यांविरोधात राबवण्यात आलेल्या विविध अभियानात या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून ४५ दहशतवादी जखमी झाले आहेत. पाच दहशवतवाद्यांना अटक करण्यात आली.

अफगाणिस्तानच्या सैन्याने १५ प्रांतामध्ये दहशतवाद्यांविरोधात १८ मोहीम राबवल्या. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाद्वारे करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मागील २४ तासात अफगाणिस्तानमधील १५ प्रांतांमध्ये १८ मोहीमा राबवण्यात आल्या. या कारवाईत किमान १०९ दहशतवाद्यांचा खात्मा झळा. ४५ दहशतवादी जखमी झाले आहेत.

कारवाईत ठार झालेले दहशतवादी एकाच संघटनेचे होते की विविध संघटनांचे होते, याबाबत अद्यापपर्यंत अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाकडून अधिकृतपणे काही सांगण्यात आलेले नाही.