‘निर्भयाच्या आईने सोनिया गांधीचे अनुकरण करावे’

advocate-indira-jaising-urges-nirbhayas-mother

नवी दिल्ली : ‘निर्भयाच्या आईने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे अनुकरण करून दोषींना माफ करावं’ असा अजब सल्ला ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी दिला आहे. त्यांच्या या विधानामुळे सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे.निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना आता नवे डेथ वॉरंट मिळाले असून त्यांना १ फेब्रुवारी रोजी फाशी होणार आहे. या फाशीवर इंदिरा जयसिंह यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘आशा देवींचं दुःख आणि वेदना समजू शकते. पण त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचं अनुकरण करावं. त्यांनी राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना माफ केलं होतं आणि त्यांना फासावर जाण्यापासून रोखलं होतं. आम्ही तुमच्यासोबत आहोत पण मृत्यूदंडाच्या विरोधात आहोत.

दरम्यान निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील सर्व चार दोषींना १ फेब्रुवारी रोजी पहाटे सहा वाजता तिहार तुरुंगात फाशी दिली जाणार आहे. या संदर्भातले नवे डेथ वॉरंट दिल्ली हायकोर्टाने जारी केले आहे. या चौघांपैकी एक दोषी मुकेश सिंह याने दयेचा अर्ज केल्याने आधी ठरलेली २२ जानेवारी ही फाशीची तारीख पुढे गेली होती. शुक्रवारी राष्ट्रपतींनी त्याचा दयेजा अर्ज फेटाळल्याने चौघांना फाशीवर चढवण्याचा मार्ग मोकळा झाला. शिक्षेला होत असलेल्या विलंबावर निर्भयाची आई आशा देवी यांनी संताप व्यक्त केला होता.

निर्भया बलात्कारप्रकरण : राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळला तरीही २२ तारखेला फाशी नाही