मोदींवर टीका करणाऱ्या हेमंत सोरेन याना अनेकांनी दिला सबुरीचा सल्ला

दिल्ली : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी मोदींवर (PM Modi) ट्विटर वरून टीका केल्यानंतर अनेकांनी त्यांना सध्याच्या कठीण काळात सबुरीने वागण्याचा सल्ला दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना फोन करून राज्यातील कोरोनाच्या स्थितीबाबत चर्चा केली होती. ट्विटरवरुन याची माहिती देताना सोरेन यांनी ट्विट केले – पंतप्रधानांनी मन की बात ऐवजी कामाचे काही सांगितले असते तर बरे झाले असते.

यावर आंध्रप्रदेश मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी सोरेन यांच्यावर टीका करताना त्यांना सल्ला दिला. रेड्डी म्हणतात, ‘तुम्ही म्हणता ते चूक आहे. देशाच्या या अवघड काळात पंतप्रधानाच्या सोबत राहून बरोबरीने काम करायला हवे. रेड्डी यांच्या सोबत अरुणाचल, नागालँड, मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांनीही सोरेन यांच्यावर टीका केली.

रेड्डी यांनी सोरेन यांना त्यांची चूक दाखवून देताना शुक्रवारी ट्विट केले – ‘ प्रिय हेमंत सोरेन, माझ्या मनात तुमच्या बद्द्दल आदर आहे. भाऊ म्हणून एक विनंती करतो. कितीही मतभेद असले तरी या पातळीवर उतरून राजकारण केले तर देश कमजोर होणार आहे. करोना विरुद्ध लढाईची ही वेळ आहे. ही वेळ कुणाकडे बोट दाखवायची नाही. पंतप्रधानाच्या सोबत राहून त्यांचे हात बळकट करायला हवेत.’

झारखंडचे माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांनीही – पंतप्रधानांनी तुम्हाला फोन करून मोठेपणा दाखविला पण तुम्ही मात्र मुख्यमंत्रीपदाची प्रतिमा मलीन केली असे सोरेन यांना सुनावले. कॉंग्रेसने मात्र मुंडा यांचे समर्थन केले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button