गंभीर गुन्ह्यांसाठी अल्पवयीन गुन्हेगारांवर चालणार प्रौढांप्रमाणे खटला

Juveline Justice

नवी दिल्ली : क्रूर आणि असाधारण गुन्ह्यांत सहभागी अल्पवयीन गुन्हेगारांवरही आता एखाद्या प्रौढ गुन्हेगारांप्रमाणे खटला चालवला जाऊ शकेल. यासाठी, कायद्यात आवश्यक सुधारणा करण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे. ‘जुवेनाईल जस्टिस ऍक्ट’संशोधन करून गंभीर गुन्ह्यांची श्रेणी पुन्हा वर्गीकृत करण्यात येणार आहे.

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातील एक आरोपी अल्पवयीन असल्यानं फाशीच्या शिक्षेपासून बचावला. यानंतर बालगुन्हेगारी कायद्याच्या वर्तमान स्वरूपाबाबत चर्चा सुरू झाली होती. गृह मंत्री अमित शहा यांनी नुकतीच यासंदर्भात एक बैठक घेतली. दीर्घकाळापासून सर्वोच्च न्यायालयासोबतच सामाजिक स्तरावर हा मुद्दा चर्चेत आला आहे.

गृह मंत्री अमित शहा यांनी घेतलेल्या या बैठकीत कायदेमंत्री रवि शंकर प्रसाद, महिला विकास मंत्री स्मृती इराणी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, हरसिमरत सिंह बादल आणि आरोग्य मंत्री हर्षवर्धन उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मंत्र्यांची ही बैठक आयोजित करण्यात आली होती. ‘जुवेनाईल जस्टिस ऍक्ट २०१५’मध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं जानेवारी २०२० मध्ये दिले होते.

जे गुन्हे बलात्कार, खून किंवा दहशतवाद श्रेणीत येत नाहीत परंतु, शिक्षा ७ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांची श्रेणी ठरविली जावी, असे निर्देश न्यायालयानं दिले होते. या गुन्ह्यांना गंभीर गुन्ह्यांच्या श्रेणीत ठेवावे, असा सल्लाही सर्वोच्च न्यायालयाने दिला होता, हे उल्लेखनीय.


Web Title : Adult prosecution of minor offenders for serious crimes

(Maharashtra Today : Latest and breaking news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra in Marathi.)